जगाचा धोका वाढला ! चीन आकाशातून जमिनीवर कुठेही अणुबाँब टाकायला आता सक्षम, हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी

भारताचा प्रमुख शत्रू चीननं सगळ्या जगाचं टेन्शन वाढवणारं काम केलं आहे. चीननं जगातील सर्वात मोठी भयानक स्पर्धा सुरु केली आहे. चीननं अंतराळातून जमीनीवर अणवस्त्र डागण्याची चाचणी केली आहे.

जगाचा धोका वाढला !  चीन आकाशातून जमिनीवर कुठेही अणुबाँब टाकायला आता सक्षम, हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी
china missile
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 5:00 PM

नवी दिल्ली: भारताचा प्रमुख शत्रू चीननं सगळ्या जगाचं टेन्शन वाढवणारं काम केलं आहे. चीननं जगातील सर्वात मोठी भयानक स्पर्धा सुरु केली आहे. चीननं अंतराळातून जमीनीवर अणवस्त्र डागण्याची चाचणी केली आहे. चीननं त्यांच्या लाँग मार्च रॉकेटच्या मदतीनं हायपरसोनिक मिसाईल अंतराळातून जमिनीवर सोडली. मिसाईलनं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर ती मिसाईल दिलेल्या टार्गेटवर डागण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते आता अंतराळातून चीन जमिनीवर कुठेही अणवस्त्र डागू शकतो यामुळं जगाचं टेन्शन वाढलंय.

अमेरिकेनं धोका ओळखला

अमेरिकेतील संरक्षण विषयक प्रसिद्ध वेबसाईट द ड्राईव्हच्या रिपोर्टनुसार चीनची ही यंत्रणा यशस्वी झाली तर संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. चीनच्या या कारनाम्याची अमेरिकन अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला. चीनची मिसाईल दिलेल्या टार्गेटपासून 32 किमीवर पडली असली तरी अमेरिकेला पुढील धोका समजला आहे.

द ड्राईव्हच्या वृत्तानुसार चीनची हायपरसोनिक मिसाईल डागण्याची क्षमता चिंता वाढवणारी ठरलीय. चीनचं हायपरसोनिक मिसाईल जगातील ताकदवर देशांच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भेदू शकते. मिसाईल डिटेक्शन सिस्टीम देखील यापूढे निकामी ठरणार आहेत.हायपरसोनिक मिसाईलमुळं पारंपारिक एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त होऊ शकतात. जगात आता कोणत्याही देशाकडं चीनच्या हायपरसोनिक मिसाईलला रोखण्याची क्षमता नाही. हायपरसोनिक मिसाईलला ब्रह्मास्त्राची संज्ञा दिली जाते. मात्र, रशियानं हायपरसोनिक मिसाईलला रोखण्याची आमची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. त्यांची एस-500 ही एअर डिफेन्स सिस्टीम हायपरसोनिक मिसाईल पाडू शकते, असं रशिया म्हणतेय.चीनचं मिसाईल हजारो कि.मी.चा प्रवास करुन हल्ला करु शकते.

अमेरिकेचं टेन्शन वाढलं

चीनच्या हायपरसोनिक मिसाईलच्या क्षमतेमुळं अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे, अंतराळातून येणाऱ्या आणि ध्वनीच्या 5 पट अधिक वेग असल्यामुळे हायपरसोनिक मिसाईलला अमेरिकेचं रडार देखील ट्रॅक करु शकत नाही. या मिसाईल त्यांच्या मार्गात नष्ट करणं अशक्य आहे. अमेरिकेच्या एअर फोर्स प्रमुखांनी गेल्या महिन्यात या धोक्याबद्दल इशारा दिला होता.

हायपरसोनिक मिसाईलसाठी जगातील देशांचे प्रयत्न

उत्तर कोरिया, रशिया आणि अमेरिका देखील हायपरसोनिक मिसाईलच्या निर्मिमतीसाठी प्रयत्न करत आहे. या देशांपूर्वीचं चीननं हायपरसोनिक मिसाईल विकसित करुन जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनचं हायपरसोनिक मिसाईल जगातील इतर देशांसह भारताचं टेन्शन वाढवणार ठरलं आहे.

या स्पर्धेत भारत कुठं?

हायपरसोनिक मिसाईल अणवस्त्रासहीत मारा करत आहेत की अणवस्त्राशिवाय हल्ला करत आहेत याचा अंदाज दुसऱ्या राष्ट्रांना येणार नाही. चीनच्या हायपरसोनिक मिसाईलमुळे अमेरिकेसह भारताचं टेन्शन वाढलंय. चीन अगोदरच लडाखमध्ये दादागिरी दाखवत आहे. तिथे त्यांनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांची जमावजमव केली आहे. चीनच्या हायपरसोनिक मिसाईलचा सामना करण्यासाठी भारताकडे देखील मिसाईल असणं आवश्यक आहे. भारत देखील अमेरिका, चीन आणि रशियानंतर हायपरसोनिक मिसाईल विकसीत करत आहे. डीआरडीओनं ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डिमॉन्स्ट्रेटर वेईकल टेस्ट केली आहे. डीआरडीओचे हे तंत्रज्ञान ध्वनीच्या सहापट वेगानं हल्ला करु शकतं. डीआरडीओ पुढील पाच वर्षात हायपरसोनिक मिसाईल विकसित करु शकतं.

इतर बातम्या:

जगातील सर्वाधिक काळ लॉकडाऊन, जनतेसाठी सर्व काही बंद, दिलासा कधी मिळणार

बांगलादेश: इस्कॉन मंदिरात जमावाकडून भाविकाची हत्या, थरारक व्हिडीओ समोर

China test fires a hypersonic missile that flew around the globe before striking the target

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.