चीनच्या कुरापती सुरुच, अरुणाचल प्रदेशच्या 15 स्थानांना चीनी भाषेत नाव, भारताची भूमिका काय?
अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलून हे तथ्य बदलणार नाही, असं उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील 15 स्थळांची नावं चीन अक्षरं तिबत्ती आणि रोमण वर्णमालेत देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सीमेवर चीनकडून (China) कुरापती सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) काही स्थळांची नावं आपल्या भाषेत ठेवली आहेत. त्यावर भारताकडून चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि राहील. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलून हे तथ्य बदलणार नाही, असं उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून (Ministry of Foreign Affairs) देण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील 15 स्थळांची नावं चीन अक्षरं तिबत्ती आणि रोमण वर्णमालेत देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यावर भारताकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश हा चीनचा दक्षिण तिब्बत असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो.
चीनकडून स्थानांची नावं बदलण्याचा दुसरा प्रकार
सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईमने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार चीनने जांगनान, अरुणाचल प्रदेशसाठी 15 स्थळांना चीनी अक्षरं, तिब्बती आणि रोमण वर्णमालेला मान्यदा दिली आहे. वृत्तानुसार चीनी मंत्रिमंडळ स्टेट काऊन्सिलद्वारे जारी नियमानुसार नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. या 15 स्थानांमध्ये आठ रहिवासी ठिकाणं, चार डोंगर, दोन नद्या आणि एक दरीचा समावेश आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशातील स्थानांची नावं बदलण्यात आल्याचा हा दुसरा प्रकार आहे.
यापूर्वी 2017 मध्ये चीनने 6 ठिकाणांची नावं बदलली होती. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिब्बत असल्याचा दावा चीन करतो. चीनचा हा दावा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तितक्याच जोरकसपणे फेटाळून लावत तो भारताचा अविभाज्य भाग असल्याचं ठासून सांगितलं आहे.
अरुणाचल प्रदेशात भारतातील नेत्यांचा दौऱ्याला चीनचा विरोध!
चीनकडून भारतातील प्रमुख नेते आणि अधिकाऱ्यांच्या अरुणाचल प्रदेशातील दौऱ्याला विरोध करत आला आहे. भारत आणि चीनमध्ये 3 हजार 488 किलोमीटरची प्रत्यक्ष ताबा रेषा (एलओसी) आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे.
ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार चीनकडून ज्या 8 रहिवासी भागांचं नाव बदलण्याचा प्रयत्न होतोय त्यात शन्ना क्षेत्रातील कोना काऊंटीमध्ये सेंगकेजोंग आणि दागलुंगजोंग, न्यिंगची क्षेत्रातील मेडोग काऊंडीमध्ये मनीगांग, डुडिंग आणि मिगपेन, न्यिंगचीच्या जायू काऊंटीमधील गोलिंग, डांगा आणि शन्नान प्रीफेक्टरमधील लुंझे काऊंटीमधील मेजागचा समावेश आहे. त्यात सांगितलं गेलं आहे की चार डोंगर वामोरी, डेउ री, लुझुंब री आणि कुनमिंगशिंगजे फेंगचा समावेश आहे.
इतर बातम्या :