भारताविरोधात चिनचा  आजपर्यंत सर्वात घाणेरडा प्लान! सैन्यात सुरु केलेय हिंदी भाषिकांची भरती

चिनी सैन्यात हिंदी भाषिकाची भरती ही भारतासाठी चिंताजनक बाब ठरु शकते. चीनच्या या बेकायदेशीर सैन्य भरतीमुळे भारत आणि चीनमध्ये तणाव आणखी वाढू शकतो. भारत चीन सीमेवरील पूर्व लडाखजवळच्या सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य मागील काही दिवसांपासून अलर्ट मोडवर आहे. एकीकडे हा तणाव कमी होण्यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे, चीनच्या कुरापती काही थांबत नाहीत.

भारताविरोधात चिनचा  आजपर्यंत सर्वात घाणेरडा प्लान! सैन्यात सुरु केलेय हिंदी भाषिकांची भरती
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 10:59 PM

बीजिंग : चिनने(China) भारताविरोधात आजपर्यंत सर्वात घाणेरडा प्लान रचला आहे. चीनने आपल्या सैनात(Chiana Army) हिंदी भाषिकांची भरती सुरू केलेय( Recruitment of Hindi speakers). चीन सातत्याने भारताविरोधात कुरघोडी करत आहेत. चिनच्या घुसखोरीच्या कृत्यांमुळे मागील दीड ते दोन वर्षापासून पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती आहे. बॉर्डरजवळ गाव बांधून, रस्ते उभारुन, धरण बांधून चीन सातत्याने काही ना काही कारवाया करत आहे. आता चिनने सैन्यात हिंदी भाषिकांची भरती सुरु करत नवीन कुरापती करण्याचा उद्योग सुरु केला आहे. पूर्व लडाखजवळील तिबेट आणि नेपाळमधील तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन चीन करत आहे.

भारतीय सीमेत घुसखोरी केल्यानंतर आता चीनने सातत्याने आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. चीन आपल्या सैन्यात हिंदी भाषा समजता आणि बोलता येणाऱ्या तरुणांची भरती करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गलवान संघर्षानंतर चीनने आता सैन्यभरतीवर जोर दिला आहे.

चिनी सैन्यात हिंदी भाषिकाची भरती ही भारतासाठी चिंताजनक बाब ठरु शकते. चीनच्या या बेकायदेशीर सैन्य भरतीमुळे भारत आणि चीनमध्ये तणाव आणखी वाढू शकतो. भारत चीन सीमेवरील पूर्व लडाखजवळच्या सीमेवर दोन्ही देशांचे सैन्य मागील काही दिवसांपासून अलर्ट मोडवर आहे. एकीकडे हा तणाव कमी होण्यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे, चीनच्या कुरापती काही थांबत नाहीत.

तिबेट, नेपाळमधीन हिंदी भाषिक तरुणांना चिन सैन्यात घेणार

तिबेट, नेपाळमधीन हिंदी भाषिक तरुणांना चिन आपल्या सैन्यात घेणार आहे. चीनकडून पूर्व लडाखजवळील तिबेट आणि नेपाळमधील तरुणांची सैन भरती सुरु देखील केली आहे. चिनी सैन्याचे अधिकारी या सैन भरतीसाठी वणवण फिरत आहेत. हे अधिकारी तिबेट, नेपाळमधील शाळा आणि कॉलेजला भेटी देत आहेत. हिंदी भाषिक तरूणांना सैन्यात भरती होण्यासाठी ते अवाहन करत आहेत. या सैनिकांना ट्रेनिंग दिल्यानांतर हिंदी भाषा येणाऱ्या या सैन्यांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्याचा चीनचा डाव आहे.

हेरगिरी करणाऱ्या तीन चीनी नागरिकांना अटक

हेरगिरी करणाऱ्या तीन चीनी नागरिकांना अटक  दिल्लीतील नोएडा येथून अटक करण्यात आली होती.  स्पेशल टास्क फोर्सने ही कारवाई केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट भारतीय आधार कार्ड जप्त केले. तिन्ही आरोपी नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिक आणि त्यांचा मित्र नटवरलाल यांच्या जवळचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चेन जुनफेंग, लिऊ पेंगफेई आणि झांग किआओ अशी अटक करण्यात आलेल्या चीनी नागरिकांची नावे आहे. हेरगिरी करत भारतीय नागरिकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचा दावा  सुरक्षा यंत्रणानी केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.