India-maldive row | भारताला भिती होती, अखेर मालदीवने तेच केलं, आत आपली रणनिती काय?
India-maldive row | सध्या भारत आणि मालदीवमध्ये टोकाचा तणाव आहे. मालदीवचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची भारतविरोधी भूमिका यामुळे ही स्थिती निर्माण झालीय. भारताने मालदीवला एक गोष्ट करु नका म्हणून सांगितली होती. मालदीवने नेमकी तीच गोष्ट केलीय. त्यामुळे भारताला मालदीवच्या या वर्तनाची दखल घ्यावीच लागेल.
India-maldive row | मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या भूमिकेमुळे सध्या भारत आणि मालदीवमध्ये मोठा तणाव आहे. मालदीव सरकार सातत्याने भारतविरोधी भूमिका घेत आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच चिनी जहाज जियांग यांग होंग 03 ने मालदीवच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. रिपोर्टनुसार, हे जहाज मालदीवची राजधानी मालेमध्ये थांबणार आहे. समुद्री सर्वे करण्यासाठी आपल्या जहाजाला बंदरात थांबण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चीनने मालदीवकडे केली होती. चीनच्या जहाजाला थांबण्याची परवानगी देऊ नका असं भारताने मालदीवला सांगितलं होतं.
समुद्रातील चीनच्या या कृतींना भारताने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. याआधी चीनच्या शि यान 6 जहाजाने श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन समुद्री सर्वे केला होता. श्रीलंकेत समुद्री सर्वे केल्यानंतर चीनने मालदीव आणि श्रीलंकेकडे आणखी एका समुद्री सर्वेसाठी परवानगी मागितली होती. भविष्यातील सैन्य इरादे लक्षात घेऊन भारताने श्रीलंका आणि मालदीवला चीनच्या जहाजाला समुद्री सर्वेची परवानगी देऊ नका असं सांगितलं होतं.
भारताची चिंता काय?
चीनने जियांग यांग होंग 03 जहाज 2016 मध्ये बनवलं. या जहाजाच वजन जवळपास 4300 टन आहे. आधुनिक सर्वेक्षण आणि टेहळणी क्षमतेची टेक्नोलॉजी या जहाजामध्ये आहे. नौसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्र तळाच्या मॅपिगद्वारे चीन भू-राजनीतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या हिंद महासागर क्षेत्रात पाणबुडीचे सहजतेने संचालन करु शकतो.
बॅलेस्टिक मिसाइल ट्रॅकर्स
मालदीवच्या सरकारच सध्याच धोरण भारतविरोधी आणि चीनच्या बाजूला झुकणार आहे. मालदीवने चीनच्या ज्या जहाजाला डॉकची परवानगी दिलीय ते बॅलेस्टिक मिसाइल ट्रॅकर्स आणि रिसर्च सर्विलांस टेक्निकमध्ये माहिर आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढलीय. चीन समुद्र सर्वेक्षणाच्या नावाखाली भारताच्या समुद्र क्षमतेवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाचा वापर करतो, ही सुद्धा भिती आहे.
मालदीवने काय म्हटलय?
चीनकडून Xian Yang Hong 03 जहाजाचा सैन्य उद्देशासाठी वापर केला जातो. हिंद महासागर क्षेत्रात या जहाजाच्या मार्फत हेरगिरी केली जाते. चीनच हे जहाज आधी श्रीलंकेत थांबणार होतं. श्रीलंकेने परदेशी जहाजांना आपल्या बंदरात थांबण्यासाठी मागच्या एक वर्षांपासून बंदी घातली आहे. त्यानंतर चीनने मालदीवचा आधार घेतला. मालदीवने नेहमीच मित्र देशांच्या जहाजाच स्वागत केलय असं मुइज्जू सरकारने म्हटलय. चिनी जहाजाने मालदीवमध्ये थांबून इंधन भरण्याची परवानगी मागितली आहे, असं मालदीवकडून सांगण्यात आलं होतं. मालदीवच्या समुद्र क्षेत्रात कुठलही रिसर्चच काम करणार नाही.