अरुणाचलमधील अपहरण झालेला मीराम चीन सैनिकांच्या ताब्यात, पीएलएकडून भारतीय सैनिकांना माहिती
अरुणाचल प्रदेशातून अपहरण करण्यात आलेल्या 17 वर्षाच्या मीराम तारौन याच्या बाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. चीनच्या पीएलए सरहद्दीवर मीरामचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मीकडून मीरामबाबत खुलासा करण्यात आला आहे
दिल्लीः अरुणाचल प्रदेशातून अपहरण करण्यात आलेल्या 17 वर्षाच्या मीराम तारौन याच्या बाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. चीनच्या (Chania) पीएलए सरहद्दीवर मीरामचे (missing boy) अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पीपल्स लिबरेशन आर्मीकडून (People’s Liberation Army) सांगण्यात आले की, अरुणाचलमधून बेपत्ता असलेला मुलगा आम्हाला सापडला आहे. त्यानंतर संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनीही स्पष्ट केले की, चीनी सैनिकांना अरुणाचल प्रदेशमधील बेपत्ता झालेला मुलगा चीनच्या सैनिकांना सापडला आहे. त्यामुळे आता पुढील कायदेशीर सोपस्कर पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत.
मीराम बेपत्ता झाल्यापासून त्याची शोधमोहिम सुरू होती. पीपल्स लिबरेशन आर्मीवर अपहरणाचा आरोप झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले याबाबत अजून आम्हाला काही कळले नाही. मात्र पीएलएकडून सरहद्दीवर होणाऱ्या कुरघोड्या झाल्यातर त्याविरोधात कारवाई करते. मात्र चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारताच्या हद्दीत असलेल्या सिआंग जिल्ह्याच्या सीमेरेषेवरून ताब्यात घेण्यात आले आहे. ओळख पटल्यानंतर आता जो बेपत्ता मुलगा होता तोच हा मीराम आहे.
औषधी वनस्पतींच्या शोधासाठी मीराम घुटमळत राहिला
चीन सैनिकांकडून मीरामला भारताच्या असलेल्या सिआंगमधून ताब्यात घेतले आहे. मीरामचा मित्र जॉनी यियिंगने सांगितले की, त्याला जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले असून पीएलएपासून बचाव करून आपण पळून येण्यात यशस्वी झाल्याचेही तो सांगतो. भारतीय सैन्य दलाला याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पीएलएबरोबर संपर्क साधून मीराम जंगलातील औषधी वनस्पतींचा शोध घेण्यासाठी गेला होता मात्र जंगलातून त्याला परत बाहेर येण्यासाठी रस्ता सापडला नसल्यामुळे तो तिथेच घुटमळत राहिला होता. त्यामुळे मीरामला भारताकडून ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका
भारतीय सैन्यांकडून पीएलएला सांगण्यात आले होते की, मीरामच्या शोधमोहिमेसाठी तुम्ही मदत करा, तर खासदार राहूल गांधी याबाबत नरेंद्र मोदींचा उल्लेख करून मीरामच्या अपहरणाबाबत पंतप्रधानांवर टीका करण्यात आली होती.
संबंधित बातम्या