Space farming: चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळात केली शेती, 30 सेंटिमीटरपेक्षा जास्त उंचीची भाताची रोपं, आता संशोधनासाठी आणणार पृथ्वीवर

याचबरोबर इतरही काही भाज्या अंतराळात उगवण्यासाठी चिनी अंतराळवीरांचे प्रयत्न सुरु आहेत. चीनच्या तिआनगोंग स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या झिरो ग्रॅव्हिटी प्रयोगशाळेत सुरु असलेल्या या प्रयोगांना यश मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

Space farming: चीनच्या अंतराळवीरांनी अंतराळात केली शेती, 30 सेंटिमीटरपेक्षा जास्त उंचीची भाताची रोपं, आता संशोधनासाठी आणणार पृथ्वीवर
अंतराळात शेती Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 8:06 PM

बिजिंग- परग्रहांवर जीवन शोधत असलेले अंतराळवीर नवनवे प्रयोग करीत आहेत. हे सगळे प्रयोग अंतराळात सुरु आहेत. अंतराळावर कब्जा मिळवण्यासाठी काही बलाढ्य देशांमध्ये संघर्षही सुरु आहे. यातच चीनच्या अंतराळ क्षेत्रातील अंतराळवीरांनी एक मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी अंतराळात तांदूळ पिकवला आहे. या अंतराळविरांकडे असलेल्या तांदळाच्या दाण्यातून त्यांनी अंतराळात हे भाताचं रोप पिकवलं आहे. याचबरोबर थेल क्रेस नावाचं एक रोपही अंतराळात उगवण्यात त्यांना यश आलेलं आहे. हे थेल क्रेस पत्ताकोबी किंवा ब्रसल स्पाऊटसारख्या हिरव्या भाज्यांचं प्रतिनिधित्व करतं.

अंतराळात वेगाने झाली रोपांची वाढ

चायनिज अकादमी ऑफ सायन्सने टीव्ही टॅनेल CGTN ला सांगितले की, या थेल क्रेस्टच्या रोपाला एका महिन्यात काही पानेही आली आहेत. तर लांब कणाच्या तांदळातून 30 सेंटिमीटर तर छोट्या कणातून 5 सेटिंमीटर रोपे उगवलेली आहेत.

याचबरोबर इतरही काही भाज्या अंतराळात उगवण्यासाठी चिनी अंतराळवीरांचे प्रयत्न सुरु आहेत. चीनच्या तिआनगोंग स्पेस स्टेशनमध्ये असलेल्या झिरो ग्रॅव्हिटी प्रयोगशाळेत सुरु असलेल्या या प्रयोगांना यश मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

काय आहे प्रयोगांचा हेतू

या अंतराळ स्थानकावर असलेल्या प्रयोगशाळेत निर्माण होणाऱ्या तांदळाच्या रोपांची वाढ कशी होईल, त्याचे संपूर्ण जीवन चक्र कसे असेल, याचा अभ्यास संशोधकांना करायचा आहे. या रोपांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अंतराळातील वातावरणाचा कही उपयोग होईल का, याचाही शोध घेण्यात येतो आहे.

डिसेंबरपर्यंत ही रोपे येणार पृथ्वीवर

अंतराळात उगवण्यात आलेली ही रोपे या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरपर्यंत पृथ्वीवर आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याने डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. इथे आणल्यानंतर या रोपांची तुलना पृथ्वीवरील रोपांशी करण्यात येणार आहे. या रोपांवर अजून काय संशोधन करण्यात येईल, ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यापूर्वीही झाले होते अंतराळात रोपांवर संशोधन

चीनने अंतराळात रोपे उगवण्यासाठी प्रयोग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही गेल्या वर्षी जुलैत अंतराळात उगवलेल्या तांदळाच्या पहिल्या बॅचची कापणी करण्यात आली होती. त्यांनी 40 ग्रॅम तांदूळ अंतराळात पाठवले होते. नंतर त्यांची पृथ्वीवर शेती करण्यात आली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.