Chinese Submarine Accident | दुसऱ्यांसाठी लावलेल्या जाळ्यात चिनी पाणबुडी अडकली, 55 नौसैनिकांचा मृत्यू?

Chinese Submarine Accident | समुद्रात चीनच्या अणवस्त्र पाणबुडीला मोठा अपघात. दुसऱ्या देशाच्या जहाजाला जाळ्यात अडकवताना चीनची पाणबुडी अडकली. समुद्रात हा अपघात नेमका कसा घडला?.

Chinese Submarine Accident | दुसऱ्यांसाठी लावलेल्या जाळ्यात चिनी पाणबुडी अडकली, 55 नौसैनिकांचा मृत्यू?
chinese nuclear submarine accident
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 11:01 AM

बिजींग : चीनमधून एक मोठी बातमी समोर आलीय. यलो सागरात चीनच्या एका अणवस्त्र पाणबुडीचा मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 55 नौसैनिकांचा मृत्यू झाल्याच वृत्त आहे. ब्रिटिश जहाजाला आपल्या जाळ्यात अडकवताना चीनच्या या पाणबुडीचा अपघात झाला. यूकेच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये हा खुलासा केलाय. रिपोर्टनुसार, ऑक्सिजन सिस्टममधल्या खराबीमुळे पाणबुडीबरोबर दुर्घटना घडली . 093-417 पाणबुडीचा कॅप्टन आणि 21 अधिकाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला. चीनने अधिकृतपणे हे वृत्त फेटाळून लावलय. चीनने आंतरराष्ट्रीय मदत घेण्यासही नकार दिला. 21 ऑगस्टला हा अपघात झाल्याच रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

स्थानिक वेळेनुसार, 8 वाजून 12 मिनिटांनी हा अपघात झाला. यात 55 नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. यात 22 अधिकारी, 7 ऑफिसर कॅडेट, 9 ज्यूनियर ऑफिसर आणि 17 खलाशी होते. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग आहे. चीन या घटनेवर मौन बाळगून आहे. अजूनपर्यंत अधिकृतपणे चीनने मान्य केलेलं नाहीय. इटेलिजेंसच्या आधारावर यूकेने हा रिपोर्ट दिलाय. नेमका अपघात कसा झालं?

अमेरिका आणि अन्य देशांच्या जहाजांना अडकवण्यासाठी चिनी नौदलाने समुद्रात साखळी आणि नांगर ठेवला होता. त्यालाच चिनी पाणबुडी धडकली. त्यानंतर ऑक्सिजन सिस्टिममध्ये बिघाड झाला. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाणबुडीतील 55 नौसैनिकांचा मृत्यू झाला. पाणबुडीतील बिघाड दुरुस्त करुन पुष्ठभागावर आणण्यासाठी 6 तास लागले. चीनने हे वृत्त फेटाळून लावलय. यूकेचा रिपोर्ट गोपनीय असून इंटलिजन्स सूत्रांवर आधारीत आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....