पुन्हा लॉकडाऊन! चीनमधील कोणत्या शहरात लॉकडाऊनचा निर्णय? रुग्णवाढीचा आकडा पाहून चकीतच व्हाल

Lockdown in the city of China : आता पुन्हा एकदा चीनमधील आणखी एका शहरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी चीनमध्ये 79 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वाधिक 37 रुग्ण हे गुआंगशीमधून समोर आले आहेत.

पुन्हा लॉकडाऊन! चीनमधील कोणत्या शहरात लॉकडाऊनचा निर्णय? रुग्णवाढीचा आकडा पाहून चकीतच व्हाल
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 6:37 AM

बिजिंग : कोरोनाचं संकट (Corona Pandemic) काही थैमान घालायचं थांबलेलं नाही. पुन्हा एकदा चीनमधील एका शहरात पूर्णपणे लॉकडाऊनचा (China Locks Down City Of  4 Million) निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास 4 मिलियन लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोनाच्या सुपर स्प्रेडर वेरीएंटनम (Super Spreader Corona varient) धुमाकूळ घातल्यानं पुन्हा एकदा लाखो लोकं घरात कैद झाली आहेत. बीजिंच विंटर ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेखातर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, चीनमधील प्रशासनानंही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. तीन दिवसांत 70 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळले असल्याचं अमर उजालानं दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलंय. त्यामुळे जगातल्या बलाढ्य अर्थव्यवस्थेपैकी एक असूनही चीननं कोविडबाबत कडक पावलं उचलण्यात कोणतीही कसूर न केल्याचाही सूर ऐकायला मिळतोय. दरम्यान, आता लॉकडाऊनमुळे चीनमधील लोकांचे मात्र पुन्हा एकदा हाल सुरु होण्याचीही भीती व्यक्त केली जातेय.

प्रवास करण्यावर पूर्णपणे निर्बंध

बैस व्हिएतनाम बॉर्डरपासून 100 किलोमीटर दूर वसलेलं शहर आहे. शुक्रवारी या ठिकाणी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. नव्या वर्षांची सुट्टी एन्जॉय करुन परतलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढलल्यानंतर रुग्णवाढीचा भडका पाहायला मिळाला. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीनं प्रशासनानं पावलं उचलत लॉकडाऊन घोषित केलाय. गुआंगशीतील बैस शहरात आता लॉकडाऊनमुळे कुणालाही घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे लोकांना घरातच कैद करण्यात आलं आहे. इतकंच काय तर गाड्यांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता प्रशासनाकडून मास टेस्टिंग सुरु करण्यात आली आहे.

दक्षिण बॉर्डरवर चोख बंदोबस्त

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चीननं आपल्या दक्षिण सीमेवर चोख बंदोबस्त तैनाक केलाय. कुणीही घुसखोरी करुन नये, किंवा बॉर्डरवरुन कोरोना व्हायरसचं संक्रमण वाढू नये, यासाठी बारीक नजर ठेवण्यात आली आहे.

मृत्यूदर आटोक्यात….

दोन वर्षांपूर्वी कोरोनानं कहर केल्यानंतर चीनमधील प्रशासनानं अत्यंत कठोर आणि कडक पावलं उचलली आहे. त्यानंतर चीनच्या मृत्यूदरातही घट झाली असल्याचा दावा केला जातो आहे. तर दुसरीकडे डेल्टा आणि ओमिक्रॉनमुळे कोरोना रुग्णवाढीचा धोका सर्वाधिक असल्यामुळे आता लोकांना घरातच कैद राहावं लागणार आहे. याआधी चीनमधील जीयान शहरातील तेरा मिलियन लोकांना लॉकडाऊनचा फटका बसला होता. अनेकांना तेव्हा लॉकडाऊनविरोधात तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

दरम्यान, आता पुन्हा एकदा चीनमधील आणखी एका शहरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी चीनमध्ये 79 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यातील सर्वाधिक 37 रुग्ण हे गुआंगशीमधून समोर आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीचा धसका चीननं घेतल्याचं पाहायला मिळालं असून खबरदारी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

..जाता जाईना कोरोना! कोविडचा प्रभाव अजून 2 दशकं, आरोग्य संघटनेचा नवा अलर्ट

Eye care tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा आहारात समावेश करा!

अचानक शुगर लेव्हल वाढली असेल तर आताच करा काही घरगुती उपचार, शुगर येईल लवकरच नियंत्रणात!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.