Amazon Forest : Amazon च्या खतरनाक जंगलात ‘त्या’ 4 मुलांची 40 दिवस मृत्यूशी झुंज, कसे राहिले जिवंत?
Amazon च जंगल इतकं भितीदायक का मानलं जातं? महत्वाच म्हणजे ही 4 मुल Amazon च्या जंगलात कशी जिवंत राहिली? या मुलांना शोधण्यासाठी एक देशाने कसं राबवलं रेसक्यू ऑपरेशन?
बोगोटा : कोलंबियामधील Amazon च्या खतरनाक जंगलातून चार मुलांची 40 दिवसानंतर सुटका करण्यात आली आहे. या मुलांनी जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलय. या मुलांच रेसक्यू मिशन संपूर्ण देशासाठी आनंदाची बाब आहे, असं कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो म्हणाले. यावर्षी 1 मे रोजी दुर्घटना घडली. ही मुलं ज्या विमानातून प्रवास करत होती, ते कोसळलं. या दुर्घटनेत मुलांची आई आणि पायलटचा मृत्यू झाला.
Amazon च्या जंगलात हा विमान अपघात झाला होता. Amazon च जंगल हे जगातील सर्वात खतरनाक जंगल मानलं जातं. विमान अपघात झाला, त्या ठिकाणी ही मुल सापडली नव्हती.
Amazon जंगल इतकं खतरनाक का?
मुलांच्या शोधासाठी अनेक सैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. एका मोठ्या स्तरावर रेसक्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मुलांना शोधून काढणं हे रेस्क्यू टीमसाठी सर्वात मोठं टास्क बनलं होतं. कारण Amazon च जंगल खूप घनदाट आहे. इथे श्वास घेणं सुद्धा कठीण आहे. वन्य प्राण्यांशिवाय या जंगलात शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले ड्रग्स तस्करांचे अड्डे सुद्धा आहेत.
40 दिवस कशी जिवंत राहिली?
असं म्हटलं जातं की, Amazon च्या जंगलात एखाद्या हरवला, तर त्याचा शोध लागणं अशक्य आहे. आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की, ही चार मुलं Amazon च्या खतरनाक जंगलात 40 दिवस कशी जिवंत राहिली.
मुलांनी असा केला सामना?
सुटका झालेली मुलं ह्यूटोटो स्वदेशी समूहाशी संबंधित आहेत. जन्मापासूनच या मुलांना जंगल स्किल्सबद्दल शिकवलं जातं. या मुलांच्या आजोबांनी सांगितलं की, “मुलांना जंगलाबद्दल चांगल्यापैकी माहित होतं. कारण त्यांना बालपणापासूनच शिकारी आणि मासे पकडण्याच ट्रेनिंग दिलय” त्यामुळे या मुलांना जंगलात जिवंत राहण्यासाठी काय केलं पाहिजे, हे माहित होतं. रेस्क्यु टीमने कसं शोधून काढलं?
रेस्क्यू टीमने या मुलांना शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. रेसक्यू टीमला सर्वप्रथम एका मुलाच डायपर मिळालं. त्यानंतर अर्धवच खाल्लेल सफरचंद मिळालं. त्यानंतर रेस्क्यु टीमने पावलांच्या ठशाचा माग घेत शोध मोहिम सुरु केली. अथक प्रयत्नानंतर अखेर मुलांचा शोध लागला. कोलंबियाच्या राष्ट्रपतींनी सांगितलं की, “रेसक्यु केलेली मुलं खूप दुर्बल झाली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केलय. मुलांच्या शरीरावर काही जखमा आहेत”