कराची | 24 ऑगस्ट 2023 : भारताने अखेर चंद्रावर पाऊल ठेवलं आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. बलाढ्य रशियाचं लुना-25 क्रॅश झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात भारताने चंद्रावर स्वारी करण्याचा इतिहास रचल्याने भारताच्या या मिशन मूनला अधिक महत्त्व आलं आहे. हे मिशन यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. तर, जगभरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातूनही भारतावर मनापासून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तुम्ही आमच्यापेक्षा खूपच पुढे आहात, अशी कबुलीच पाकिस्तानी नागरिक देताना दिसत आहेत.
भारताने चंद्रावर तिरंगा फडवून संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला आहे. इस्रोच्या मेहनतीवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारताच्या या यशाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर Congratulations Neighbors चा ट्रेंडही सुरू झाला आहे. विशेष म्हणजे हा ट्रेंड पाकिस्तानच्या नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे सुरू झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांनी सोशल मीडियावरून भारताला शुभेच्छा देताना Congratulations Neighbors असं म्हटलं आहे. तसेच भारताच्या या मेहनतीचं कौतुकही केलं जात आहे.
अभिनंदन शेजाऱ्यांनो (Congratulations Neighbors). तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. यात कोणताही शंका नाही, असं उसबाह मुनेम या पाकिस्तानी यूजर्सने म्हटलं आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये चांद्रयान -3चा फोटोही पोस्ट केला आहे.
Congratulations Neighbors 👏
No doubt your are doing best in technology.#Chandrayaan3Success pic.twitter.com/6CUoBgVCMA— UsBaH MuNeM🇵🇰🇵🇸 (@UsBaMuNeM1) August 24, 2023
तर यासिर खान याने अल्लाह कोणत्याही समाजाची परिस्थिती तोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत तो बदलणार नसेल. अभिनंदन शेजाऱ्यांनो (Congratulations Neighbors). मोठी कामगिरी केलीत, असं म्हटलं आहे.
Allah os qoam ki halat tab tak nhi badlta jab tak wo khud na badle .
Congratulations Neighbors ❤️
Great Achievement 👍 pic.twitter.com/0M2PA978rA— Yasir khan (@yks6777) August 23, 2023
पाकिस्तानी नागरिक मतभेद विसरून गेले आहेत. अभिनंदन, असं हसीब अहमद यांनी म्हटलं आहे. तसेच एक पाकिस्तानी नागरिक म्हणून मला असं वाटतं की आर्थिकरित्या भारत आपल्या खूप पुढे आहे. त्यामुळे आज भारताचं अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन भारत. Congratulations Neighbors. पाकिस्तानकडून प्रेम, असं आमिर अवान यांनी म्हटलं आहे.
Pakistanis have put aside their differences, and the Congratulations India is trending in Pakistan along with Congratulations Neighbors.
India 🇮🇳 has shown the region that despite every difficulty, if you have sincere people, then nothing is impossible. pic.twitter.com/QncrWN7nkG— Haseeb Ahmed (@Haseeb_Ahmed247) August 23, 2023
पाकिस्तानी नागरिकांनी भारताला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना प्रत्येक नागरिकाने आपल्या ट्विटमध्ये Congratulations Neighbors हा शब्द वापरला आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर Congratulations Neighbors हा शब्द अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे.