जगात काय घडतंय? : जगातील 30% कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत, रशियात 900 सैनिकांना कोरोना

जगातले 30 टक्के कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेतच आहेत. काल अमेरिकेने 10 लाखांचाही आकडा पार केला.

जगात काय घडतंय? : जगातील 30% कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत, रशियात 900 सैनिकांना कोरोना
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 12:40 AM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादु्र्भाव दिवसेंदिवस वाढत आहे (Corona Effect On World). कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याशिवाय या दरम्यान, जगात अनेक मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा (Corona Effect On World)

1. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी तामिळनाडूने आंध्र प्रदेशच्या सीमेवर चक्क भींत बांधली आहे. तामिळनाडूने सीमेवर 5 फूट उंच भींत उभी केली. यामुळे तामिळनाडूतून आंध्रला जाणारा 10 हजार लीटर दुधाचा पुरवठासुद्धा थांबवण्यात आला आहे. एकट्या तामिळनाडूतच नव्हे, तर ओडिशा राज्यातही असा प्रकार घडला आहे. शेजारच्या राज्यातून कुणीही आपल्या राज्यात येऊ नये म्हणून, तिथल्या काही लोकांनी सीमेवर मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत.

2. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जर तुम्ही विमान प्रवासाचा विचार करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला पासपोर्टबरोबरच आता मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा सक्तीचं केलं जाण्याची शक्यता आहे. अनेक विमान कंपन्या याबाबत विचार करत आहेत. त्याशिवाय, विमानातलं मधलं सीट रिकामं ठेवण्याबाबतही विचार सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊन जेव्हा-केव्हा संपेल, त्यानंतर प्रवास आणि प्रवासाच्या पद्धती यांच्यातही बराच बदल होणार आहे.

3. चीनमध्ये कोरोना विषाणूचे गुणधर्म चक्क हवेत सापडल्याचा दावा पुढे आला आहे. चीनी संशोधकांनी वुहानमधले दोन हॉस्पिटल आणि कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणच्या हवेचे नमुने तपासले. तिथल्या हवेत कोरोनाचे काही गुणधर्म आढळून आले आहेत. मात्र, हवेद्वारे कोरोनाची लागण झाली असेल की नाही, याची माहिती अजून मिळालेली नाही. आतापर्यंत ज्यांना-ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांना हवेतून कोरोनाची लागण झाल्याचं अद्याप एकही उदाहरण समोर आलेलं नाही.

4. न्यूझीलंड सरकारने कोरोनाचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये फक्त 1 किंवा 2 कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातलं युद्ध आपण जिंकल्याचा दावा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी केला. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचे 1,472 रुग्ण आहेत. त्यापैकी तब्बल 1,214 रुग्ण बरे झाले असून सध्या तिथल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या फक्त 239 इतकी आहे (Corona Effect On World).

5. कोरोना संशयित किंवा कोरोनामुक्त रुग्णाला भारतासह इतर देशांमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं. मात्र, चीनमध्ये तब्बल 28 दिवस क्वारंटाईन केलं जातं. खबरदारी म्हणून चीन सरकारनं घेतलेला हा निर्णय चांगलासुद्धा ठरतो आहे. चीनने 14 प्लस 14 असं नवीन समीकरण बनवलं आहे. ज्यात कोरोनापासून मुक्त झालेला व्यक्ती, हा आधी 14 दिवस दवाखान्यातच क्वारंटाईन राहणार, त्यानंतरचे 14 दिवस तो स्वतःच्या घरात क्वारंटाईन राहणार आहे.

6. रशियात तब्बल 900 सैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी निम्मे जण हे घरातच क्वारंटाईन झाले आहेत. तर निम्मे सैनिकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रशियात 9 मेला होणारी ऐतिहासिक परेडसुद्धा पुतीन यांनी रद्द केली आहे. दरम्यान, रशियात सध्या 93 हजारांहून जास्त जण कोरोनाबाधित आहेत. रशियानं आतापर्यंत 31 लाखांहून जास्त कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत.

7. जर्मनीत एक लाखांहून जास्त रुग्ण असूनही तिथे अनेक उद्योग सुरु करण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या लाखांवर असली, तरी वेळेआधीच केलेलं नियोजन आणि सशक्त आरोग्य यंत्रणा यांच्या जोरावर तिथली परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे वाहन उद्योगांसह अनेक उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका माहितीनुसार, जर्मनीतली प्रसिद्ध वाहन उत्पादक वोक्सवॅगन कंपनीनेसुद्धा उत्पादन सुरु केलं.

8. व्हॉट्सअॅपवर कोरोनासंबंधीचे मेसेजे फॉरवर्ड करण्याचं प्रमाण 70 टक्क्याने कमी झालं आहे. वेगवेगळ्या देशात खोट्या बातम्या आणि खोटे मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर ता्त्काळ कारवाई केली जाते. त्यामुळे इतर अनेक लोकांवरही आता त्या कारवाईचा जरब बसतो आहे. एका बातमीनुसार व्हॉट्सअॅपने मागच्या आठवड्यात जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.

9. जगातले 30 टक्के कोरोनाचे रुग्ण एकट्या अमेरिकेतच आहेत. काल अमेरिकेने 10 लाखांचाही आकडा पार केला. सध्या तिथे 10 लाख 10 हजारांहून जास्त कोरोनाबाधित आहेत आणि 56 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मृतांचा आकडा हा 70 हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, असं असलं तरी जगात अमेरिकेनेच सर्वाधिक चाचण्या घेतल्या आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 56 लाख 96 हजार चाचण्या घेतल्या आहेत. अमेरिकेहून निम्मे चाचण्यासुद्धा अजून कोणत्याही देशाने घेतलेल्या नाहीत.

10. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी भारतासाठी दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. देशातल्या 80 जिल्ह्यात मागच्या 7 दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यापैकी 17 जिल्ह्यांमध्ये तर मागच्या 21 दिवसांपासून कोरोनाचा फैलाव थांबल्याचं चित्र आहे. मात्र, महाराष्ट्रात पुणे, मालेगाव या भागात वेगानं रुग्ण वाढत आहेत. दिल्ली आणि इंदूरमध्येही रुग्णसंख्येचा वेग मागच्या काही दिवसांपासून (Corona Effect On World) वाढला आहे.

संबंधित बातम्या :

जगभरात 82 कोटीहून अधिक लोक उपाशी पोटी, कोरोनामुळे घडणाऱ्या ‘या’ 11 घटनांनी जगभरात उलथापालथ

हे पहिल्यांदा घडतंय : बांग्लादेशी तरुण उपचारासाठी पोहत पोहत आसाममध्ये

जगात काय घडतंय? : जपानने बागेतील सर्व फुलं तोडली, अफगाणिस्तानात राष्ट्रपतींच्या स्टाफमधील 20 कोरोना पॉझिटिव्ह

इंग्लंडमध्ये कंपन्यांनी सुट्टीवर पाठवलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार पगार देणार, कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.