Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे पहिल्यांदा घडतंय : बांग्लादेशी तरुण उपचारासाठी पोहत पोहत आसाममध्ये

कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मोठे बदल पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

हे पहिल्यांदा घडतंय : बांग्लादेशी तरुण उपचारासाठी पोहत पोहत आसाममध्ये
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 11:11 PM

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने हाहा:कार माजवला (Corona Virus Effect In World) आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात मोठे बदल पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांनी वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालवधी आणखी वाढवला आहे. भारताने देखील 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत (Corona Virus Effect In World).

1. नदी ओलांडून एक बांग्लादेशी भारतात शिरल्याची घटना घडली. बराच अंतर पोहून हा तरुण आसाममधल्या एका गावात पोहोचला आणि माझ्यावर कोरोनाचे उपचार करा, म्हणून सांगू लागला. गावातले लोक घाबरल्यामुळे त्यांनी सैन्याच्या एका तुकडीला बोलावलं. भारतीय सैन्यानं तरुणाला ताब्यात घेतलं असून तात्काळ बांग्लादेशी सैन्याच्या हवाली केलं. फक्त कोरोनाच्या उपचारासाठी ही व्यक्ती बांग्लादेशातून भारतात पोहत आली. हिंदूस्थान टाईम्सनं ही बातमी दिली.

2. ओझोन थरावर पडलेलं सर्वात मोठं छिद्र भरुन निघाल्याचा दावा काही शास्रत्रज्ञांनी केला आहे. तसं असेल तर लॉकडाऊनमुळे झालेला हा सर्वात मोठा फायदा आहे. युरोपियन सॅटेलाईट सिस्टीम कोपरनिकसनं याबाबत शोध घेतला. मात्र, ओझोनच्या थरावरचं छिद्र लॉकडाऊनमुळेच भरलं गेलं, की त्याला इतर काही कारणं आहेत, याबाबत अजूनही शास्रज्ञांमध्ये मतभेद आहेत.

3. महिलांच्या अश्लिलतेमुळेच कोरोना व्हायरस पसरल्याचा शोध पाकिस्तानातल्या मौलवीनं लावला. समाजात अश्लिलता आणि नग्नता वाढल्यामुळे अल्लाहचा कोप झाल्याचा अजब दावा या मौलवीनं केला. विशेष म्हणजे टीव्हीवरच्या एका लाईव्ह कार्यक्रमात हा दावा केला गेला. ज्या कार्यक्रमात खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सुद्धा उपस्थित होते. मदतनिधी जमवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, मूळ हेतूऐवजी मौलवीच्या दाव्यामुळेच हा कार्यक्रम चर्चेत आला.

4. मृत समजून ज्या महिलेचा दफनविधी केला गेला, तीच महिला 1 महिन्यानं घरी परतल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आणि आनंदही झाला. इक्वाडोरमध्ये ही अजब घटना घडली. 74 वर्षीय एक महिला कोरोनाग्रस्त झाल्यामुळे दवाखान्यात भर्ती होती. उपचारादरम्यान ती बेशुध्द झाली. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घाबरलेल्या कुटुंबियांनी चेहराही न पाहता रुग्णालयानं दिलेल्या मृतदेहाचा दफनविधी केला. मात्र, रुग्णालयाकडून दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह दिला गेला. काही दिवसांनी ती वृद्ध महिला पुन्हा शुद्धीत आल्यानंतर सर्व प्रकार समोर आला.

5. हज यात्रेला जाण्यासाठी जमवलेला पैसा एका मुस्लिम व्यक्तीनं गरिबांसाठी खर्च केला. शेतकरी आणि मजुरांना अब्दुल रेहमान नावाच्या माणसानं स्वखर्चानं अन्नधान्याचं वाटप केलं. कर्नाटकच्या गुद्दीनाबली गावात ही व्यक्ती राहते. अन्नधान्य वाटपासाठी अब्दुल रेहमान यांनी आतापर्यंत तब्बल 80 हजार रुपये खर्च केल्याची माहिती आहे. आपली माणसं उपाशी राहू नयेत, या दृष्टीकोनातून त्यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली.

6. वर्क फ्रॉम होम अनेक कंपन्यांसाठी चांगला रिझल्ट देत असलं, तरी अनेक जोडप्यांमधले ताण-तणाव वर्क फ्रॉम होममुळे वाढले आहेत. खासकरुन पती आणि पत्नी दोन्ही वर्क फ्रॉम होम करत असतील, तर त्यांच्या घरातल्या कामाचं नियोजन कोलमडून पडतं. कोरोनामुळे मोलकरीनसुद्धा कामावर येणं बंद झालं. त्यामुळे अनेक नोकरदार जोडप्यांना घर आणि ऑफिस सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Corona Virus Effect In World)

7. लॉकडाऊनच्या काळात देवासारखा धावून आलेल्या पोलिसाचंच नाव एका आईनं आपल्या जन्मलेल्या बाळाला दिलं. दिल्लीतल्या एका गर्भवती महिलेची डिलीव्हरी जवळ आल्यामुळे कुटुंबियांची धावाधाव सुरु झाली. अशावेळी दयावीर नावाचा एक हवालदार मदतीसाठी धावून आला. त्यांनी महिलेला रुग्णालयात तर पोहोचलवंच, पण त्याबरोबर त्यांची आणि कुटुंबियांची काळजी सुद्धा घेतली. त्यामुळे डिलीव्हिरीनंतर त्या महिलेनं त्या हवालदाराचं दयावीर हे नाव आपल्या बाळाला दिलं.

8. कोरोनाविरोधी चाचणीचा माकडांवर यशस्वी प्रयोग केल्याचा दावा चीनने केला. चीनमध्ये काही माकडांना लस दिली गेली. त्यानंतर त्यांना कोरोनाच्या संपर्कात आणलं गेलं. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. सिनोवैक बायोटेक या कंपनीनं ही चाचणी केली. मात्र, आता ही लस माणसांसाठी किती परिणामकारक ठरते. याकडे सर्वांचं लक्ष आहे. माकडांवर यशस्वी परीक्षण झाल्यानंतर माणसांवर या चाचणीची ट्रायल घेतली जाणार आहे.

9. रमजानमध्ये सामूहिक नमाजासाठी 24 हून जास्त लोकांना एकत्र जमवणाऱ्या मौलवीलाच कोरोनाची लागण झाली. बांग्लादेशच्या मगुरा जिल्ह्यात ही घटना घडली. मौलवी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्याच्या 25 इतर सहकाऱ्यांनाही घरातच क्वारंटाईन करण्यात आलं. जर त्यांच्यात काही लक्षणं आढळली, तर त्या सर्वांचीही टेस्ट घेतली जाणार आहे. बांग्लादेशात मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करु नका, असं आवाहन करण्यात आलं. मात्र, काही मौलवी तरीही लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत.

10. अमेरिकेत कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू होऊनही लोक काहीही शिकलेले नाही. कॅलिफोर्नियातील समुद्र किनाऱ्यांवर रविवारी तुफान गर्दी उसळली. कोणत्याही प्रकारचा मास्क आणि सोशल डिस्टसिंगविना जमलेल्या लोकांना कोरोनाचं कोणतंही गांभीर्य नव्हतं. धक्कादायक म्हणजे खुद्द कॅलिफोर्नियामध्येच 43 हजारांहून जास्त लोक कोरोनाबाधित आहेत आणि 1700 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सीएनएननं ही बातमी दिली.

Corona Virus Effect In World

संबंधित बातम्या:

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

‘जनता कर्फ्यू’ आणि ‘कोरोना’बाबत 10 विलक्षण गोष्टी

दारुऐवजी सॅनिटायझरची निर्मिती, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

Corona Virus : न्यूझीलंडमध्ये सलग दुसऱ्यांदा आणीबाणीच्या कालावधीत वाढ, कोरोनामुळे जगात ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.