New Guidelines for International Travelers in India | या 19 देशातून येणाऱ्यांसाठी असणार नवी नियमावली

ज्या देशांमध्ये कोरोनाचे संकट आहे, त्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ब्रिटिनसह अन्य १९ देशांतून येणाऱ्यांसाठी हे नियम असणार आहेत.

New Guidelines for International Travelers in India | या 19 देशातून येणाऱ्यांसाठी असणार नवी नियमावली
international tourist
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 9:10 PM

दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड १९ च्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत. परदेशातील ज्या देशांमध्ये कोरोनाचा धोका कायम राहिला आहे, अशा देशांतून येणाऱ्यांसाठी ही नवी नियमावली असणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या यादीतील ज्या देशातून नागरिक येणार त्यांची विमानतळावरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यामध्ये तो प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला तर पुढील चाचणीसाठी त्यांचे रिपोर्ट पाठवले जाणार आहेत. त्यानंतर सरकारच्या नियमानुसार त्यांना आयसोलेट केले जाणार आहे मात्र आयसोलेशन केले जाणार नाही. आरोग्य मंत्रालयाच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी स्टँडर्ड प्रोटोकॉल लागू केला जाणार आहे. 22 जानेवारीपासून कोरोनाग्रस्त देशातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आयसोलेशन सुविधा सक्तीची नसणार आहे. याआधी 7 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये आयसोलेशनमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर सरकारने लागू केलेल्या नियमांचीही सक्ती करण्यात आली होती.

शुक्रवारपासून लागू होणार नवी नियमावली

कोरोनाबाबतच्या नवी नियमावली शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून लागू होणार आहे. याआधी 11 जानेवारीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती. या नियमावलीसारखे पुढील नियमावली जाहीर होईपर्यंत हे नियम लागू केले जाणार आहेत. आरोग्य मंत्रालयाने आपल्या आदेशमध्य म्हटले आहे की, बदलत्या परिस्थितीनुसार ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. यामध्ये होम आयसोलेशन लागू करण्यात आले आहे.

कोणते आहेत ते 19 देश

सद्य परिस्थितीत जगातील एकूण 19 देश करोनामुळे संकटग्रस्त आहेत. यामध्ये ब्रिटिनबरोबर युरोपमधीलही काही देशांचा समावेश आहे. या 19 देशांतून येणाऱ्यांना समान नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बोत्स्वाना, चीन, घाना, मॉरिशियस, न्यूझिलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हॉंगकॉंग, इज्रराईल, कांगो, इथियोपिया, कजाकिस्तान, केनिया, नायझेरिया, ट्यूनिशिया या देशांचा समावेश 19 देशांच्या यादीत केला गेला आहे.

निर्णय लांबणीवर

मार्च 2020 मध्ये पहिल्या लॉकडाऊनंतर भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात होती. त्यानंतर मागील वर्षी 15 डिसेंबरला ही बंदी उठविण्यात येणार होती. मात्र ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांच्या निर्णयाबाबतचा निर्णय 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.