Covid Updates: यूरोपमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं, तिसऱ्या लाटेनं मृत्यूचं तांडव, भारतासाठीही धोक्याची घंटा?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात अशा देशांचाही समावेश आहे जिथे 70 टक्के किंवा त्याहून जास्त लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली आहे की युरोप पुन्हा एकदा कोविड महामारीचं केंद्र बनलं आहे आणि फेब्रुवारीपर्यंत आणखी 5 लाख मृत्यू होऊ शकतात.
नवी दिल्लीः भारतातील कोविडची रुग्ण संख्या सध्या नियंत्रणात असली तरी जगातील इतर देशांमध्ये ही परिस्थिती नाही. विशेषतः युरोपियन देशांमध्ये नवीन कोविड रुग्णांच्या संखेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. चीन असो वा पाश्चात्य देश, कोविडचा हाहाकार पहायला मिळतोय, ज्यामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम युरोपच्या देशांमध्ये, अमेरीकेत आणि काही आणखी देशांमध्ये कोविडची नवीन लाट आलीये आणि रूग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात अशा देशांचाही समावेश आहे जिथे 70 टक्के किंवा त्याहून जास्त लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चेतावणी दिली आहे की युरोप पुन्हा एकदा कोविड महामारीचं केंद्र बनलं आहे आणि फेब्रुवारीपर्यंत आणखी 5 लाख मृत्यू होऊ शकतात, अशी भिती व्यक्त केली आहे.
WHO, केंद्र सरकार आणि आरोग्य तज्ञांनी भारतात कोविडच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. भारतात सध्या कोविडची परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्ण संख्या वाढण्याचा धोका टळलेला नाही. आता सरकार पुन्हा सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू करणार आहे. हे आवश्यक आहे कारण बरेच लोक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकले आहेत. पण कोविडची पाश्चात्य देशांमधली भयंकर परिस्थिती पाहता भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, हे नक्की.
In Italy, only people who have been vaccinated or have recovered from COVID-19 will be able to eat at indoor restaurants, go to the movies, or attend sporting events from Dec. 6. The government is trying to contain rising infections and prevent lockdowns. https://t.co/slye1J9Nnu
— The Associated Press (@AP) November 24, 2021
भारतात पुर्णपणे लसीकरण झालेले लोकं फक्त 30%
भारतात 118 कोटी लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत आणि एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 30 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. मात्र जगाच्या इतर भागांतील परिस्थिती पाहता- जिथे लसीकरणाची टक्केवारी भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे, भारताने निश्चितपणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जुलैमध्ये राष्ट्रीय सेरोसर्व्हेमध्ये भारतात 67% लोकसंख्येमध्ये कोविड अँटीबॉडीज आढळून आले होते. नंतर दिल्ली, केरळ आणि हरियाणामधील सेरोसर्व्हेमध्ये, अनुक्रमे 90%, 80% आणि 70% पेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये सेरोपॉझिटिव्हिटी आढळली आहे. मात्र, जास्त लोकसंख्येमुळे भारतात संक्रमणाचा प्रसार किती वेगाने होतो हे एप्रिल-जूनमधील कोविडच्या दुसऱ्या लटे दरम्यान स्पष्ट झाले आहे.
जगातली कोविडची परिस्थिती
कोविड जगभर पसरतच आहे. आतापर्यंत 200 देशांमध्ये जवळपास 260 दशलक्ष कोविडचे रुग्ण आढळले आहेत आणि 5 दशलक्षाहून अधिक मृत्यू झाले आहेत. रशिया, युक्रेन, जर्मनी, पोलंड, ब्रिटन, ऑस्ट्रिया, नेदरलँड्ससह अनेक युरोपीय देशांमध्ये अलीकडे कोविड व्हायरसच्या डेल्टा वेरिएंटमुळे रूग्णसंख्या रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये पार्शियल लॉकडाऊन लागू केला आहे. 21 नोव्हेंबर रोजी, युरोपमधील नवीन कोविड रुग्णांनी 3.3 लाखांच्या विक्रमी उच्चांकावर झेप घेतली. जर्मनीमध्ये 70,000 हून अधिक नवीन कोरोनाव्हायरस केसेस नोंदवली गेली आहेत, जी आतापर्यंतची रेकॉर्डवरील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ आहे. तर, मंगळवारी फ्रान्समध्ये एकूण 30,454 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली, जी ऑगस्ट महिन्यापासून सर्वाधिक आहे.
इतर बातम्या