Covid Updates:लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून विलगीकरण नाही; मात्र, आरटीपीसीआर रिपोर्ट हवाच

ज्या प्रवाशांचं पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि कोविड -19 ची लस घेऊन 15 दिवस उलटले आहेत, त्यांना विमानतळातून क्वारंटाईन आणि चाचणीशिवाय बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. हायरिस्क (High Risk catergory) देशांमधून येण्याऱ्या लोकांना हा नियम लागू नाही.

Covid Updates:लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून विलगीकरण नाही; मात्र, आरटीपीसीआर  रिपोर्ट हवाच
मुंबई विमानतळ
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 2:01 PM

मुंबईः कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून भारतात प्रवेश दिला जाणार आहे. भारतात प्रवेश दिल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. मात्र, भारतात प्रवेशापूर्वी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. ही मुभा ज्या प्रवाशींनी डब्ल्यूएचओ (WHO) मान्यताप्राप्त कोविड -19 लसी घेतली आहे किंवा भारताने ज्या देशांशी राष्ट्रीय पातळीवर परस्पर करार केले आहेत, अशा देशांमधून येणाऱ्यांना आहे. (covid19-international vaccinated passengers will get entry in india without quarantine)

मात्र हायरिस्क (High Risk catergory) देशांमधून येण्याऱ्या लोकांना हा नियम लागू नाही. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि यूकेसह युरोपमधील देशांचा समावेश आहे.

काय आहे नविन नियम

“ज्या प्रवाशांचं पूर्णपणे लसीकरण झाले आहे आणि कोविड -19 ची लस घेऊन 15 दिवस उलटले आहेत, त्यांना विमानतळातून क्वारंटाईन आणि चाचणीशिवाय बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. आगमनानंतर 14 दिवस त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण त्यांनी स्वतः करायचे आहे”, असे आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. मात्र COVID-19 RT-PCR चाचणीचा नेगेटिव्ह रिपोर्ट आगमनानंतर विमानतळावर सादर करणे आवश्यक आहे. चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासांच्या आत घेणे गरजेचे आहे.

अर्धवट किंवा लसीकरण न झालेल्या प्रवाशांनी मूळ नियम आणि आवश्यक उपाययोजना लागू आहेत. या नियमांमध्ये आगमनानंतरच्या COVID-19 चाचणीसाठी नमुना देणे, सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन, भारतात आल्याच्या आठव्या दिवशी पुन्हा COVID-19 चाचणी करणे यांचा समावेश आहे.

सर्व प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर (Air Suvidha) स्वयं-घोषणा (self declaration) फॉर्म भरणे आणि नेगेटिव्ह COVID-19 RT-PCR रिपोर्ट अपलोड करणे गरजेचे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी 72 तासांच्या आत घेण्यात यावी.

भारतात कोरोनाची स्थिती

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 1 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 306 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 443 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता पावणेदोन लाखांच्या आत आहे.

संबंधित बातम्या 

‘देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा’, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

कोरोनाने भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य दोन वर्षांनी घटवले, या दाहक निष्कर्षाचे काय, सामनातून सवाल

(covid19-international vaccinated passengers will get entry in india without quarantine)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.