श्रीलंकेचे संकट अधिक गहिरे, राष्ट्रपतींच्या पलायनानंतर आता रानील विक्रमसिंघे यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा, परिस्थिती चिघळण्याची शक्यता
राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती भवन आणि राजधानीतील सरकारी कार्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहेत.
कोलंबो- श्रीलंकेतील (Sri Lanka)आर्थिक संकटामुळे संतापलेल्या जनतेने थेट राष्ट्रपती भवनावरच हल्लाबोल केला. हजारोंच्या संख्येने श्रीलंकन नागरिक राष्ट्रपती भवनाचे दार तोडून आत पोहचले. दरम्यानच्या काळात राष्ट्रपती राजपक्षे (President fleed)यांनी दुसऱ्या देशात पलवायन केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करीत असलेले पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनीही राजीनामा (PM Resign)दिल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती भवन आणि राजधानीतील सरकारी कार्यालयांसमोर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले आहेत.
Ranil Wickremesinghe resigns as Prime Minister of Sri Lanka#SriLankaCrisis pic.twitter.com/0AF8BfpmcH
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) July 9, 2022
आंदोलकांचा उद्रेक
श्रीलंकेत सरकारच्या विरोधातील उद्रेक रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे. संतापलल्या लोकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर हल्ला करत, राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले आहे. घरात आतपर्यंत नागरिक पोहचल्यानंतर, राष्ट्रपती तिथून निघाले असल्याची माहिती आहे. राष्टपती राजपक्षे हे देश सोडून पळून गेल्याचीही माहिती आहे. देशात कधीही आणीबाणी म्हणजेच मार्शल लॉ लागू करण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात येते आहे
#WATCH | Sri Lanka: People gather in large numbers outside the Presidential Secretariat in Colombo as the beleaguered island-nation witnesses massive protests amid ongoing economic turmoil
(Source: Reuters) pic.twitter.com/H2AprxYxsN
— ANI (@ANI) July 9, 2022
श्रीलंकेत 15 जुलैपर्यंत सर्व शाळा बंद
श्रीलंकेतील सर्व शाळा 15 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार विद्यापीठांना अस्थायी रुपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वाढलेल्या आर्थिक संकटामुळे नागरिक हैराण आहेत. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा देण्याची मागणी तीव्र होते आहे.
दबावानंतर पोलिसांनी कर्फ्यू हटवला
श्रीलंकेतील सर्वोच्च वकिलांची सघटना, मानवाधिकार संस्था आणि राजकीय पक्षांच्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी कर्फ्यू हटवल्याची माहिती आहे. त्यानंतर देशात जोरदार विरोधी आंदोलने झाली. कोलंबो सहीत देशातील पश्चिमेच्या भागात सात ठिकाणी हा कर्फ्यू लावण्यात आला होता. यात नेगोंबो, केलानिया, मुगेगोडा, माऊंट लिविनिया, उत्तरी कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि मध्य कोलंबोचा समावेश होता. शुक्रवारी रात्रीपासून पुढझील सूचनेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता. पोलीस महानिरीक्षकांनी या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये असे आवाहनही केले होते.