पाकिस्तानी अभिनेत्रीचा घरात नग्न मृतदेह आढळला, हत्या करुन गुन्हेगार बाथरूमच्या खिडकीतून फरार

पाकिस्तानची मॉडेल आणि अभिनेत्री नायब नदीम (Nayab Nadeem) रविवारी (11 जुलै) लाहोरमधील (Lahore) डिफेन्स एरियात आपल्या घरात मृतावस्थेत सापडली.

पाकिस्तानी अभिनेत्रीचा घरात नग्न मृतदेह आढळला, हत्या करुन गुन्हेगार बाथरूमच्या खिडकीतून फरार
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 6:40 AM

इस्लामाबाद : पाकिस्तानची मॉडेल आणि अभिनेत्री नायब नदीम (Nayab Nadeem) रविवारी (11 जुलै) लाहोरमधील (Lahore) डिफेन्स एरियात आपल्या घरात मृतावस्थेत सापडली. एक्सप्रेस ट्रिब्यूनके दिलेल्या वृत्तानुसार, 29 वर्षीय नदीमची डीएचए फेज-5 मधील तिच्या घरात अज्ञात व्यक्तींनी गळा आवळून हत्या (Murder) केली. नदीमच्या शरीरावर आणि मानेवर काही निशाण सापडले आहेत. त्यामुळे हत्येपूर्वी पीडितेवर बलात्कार झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

डिफेन्स बी स्टेशनचे पोलीस अधिकारी नय्यर निसार म्हणाले, “पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. पोलिसांनी पीडित नदीमचा सावत्र भाऊ नासिरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केलाय. नासिरने सांगितलं की तो जेव्हा बहिणीला भेटायला पोहचला तेव्हा ती फरशीवर नग्न (विवस्त्र) अवस्थेत पडलेली दिसली.

बाथरुमची खिडकी तोडून आरोपी पळाले

नासिरने बहिण नदीमला फोन केला, मात्र तिने उचलला नाही. त्यामुळे तो नदीमला भेटण्यासाठी घरी आला. घरी दरवाजाच्या बेल वाजवूनही दरवाजा उघडला नाही. विशेष म्हणजे त्यावेळी नदीमची कार घराबाहेरच उभी होती. त्यामुळे नासिरने प्रयत्नपूर्वक दरवाजा उघडून आत पाहिलं तर त्याला नदीमचा नग्न मृतदेह फरशीवर पडलेला दिसला.

नदीच्या घराच्या बाथरुमची खिडकी तुटलेली आढळली. त्यामुळे हत्येनंतर आरोपी या खिडकीतूनच फरार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मॉडेल नायब नदीम घरात एकटीच राहायची. तिचं लग्न झालेलं नव्हतं. नासिरने सांगितलं, “मी नदीमची चौकशी करण्यासाठी नेहमी यायचो. तिला घरातील गरजेच्या वस्तू आणून द्यायचो.”

मुली सर्जन झाल्यानंतर कट्टरतावाद्यांकडून आगपाखड

पाकिस्तानमध्ये महिला आणि इतरांचे अधिकार आणि सुरक्षितता यावर प्रश्निचिन्ह नेहमीच उभं राहिलंय. एक दिवस आधीच पाकिस्तानचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर जावेद इकबाल यांनी एक ट्वीट केलं. त्यांनी ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला. यात ते आपल्या यूनिटमध्ये 7 मुलींना सर्जनचं ट्रेनिंग देत होते. मात्र, यावरही पाकिस्तानमधील कट्टरतावादी भडकले. त्यांनी डॉक्टर जावेद यांना ट्रोल केलं. सर्जन हे मुलींचं क्षेत्र नाही, त्यांनी या क्षेत्रात नसावं असंच ते सांगत होते.

हेही वाचा :

Video | बलुचिस्तानमध्ये ‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

भारतातच नाही तर ‘या’ देशांतही बोलली जाते ‘हिंदी’ भाषा! जाणून घ्या या देशांबद्दल…

लाहोर हादरलं, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट, 12 जखमी

व्हिडीओ पाहा :

Dead body of Model actress Nayab Nadeem without cloth found in Pakistan

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.