VIDEO:मृत्यू होऊन आला हिमनग, एकाच आठवड्यात हिमस्खलनाचा दुसरा अपघात, एका अपघातात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू
इटलीत झालेल्या या दुर्घटनेत ११ जण ठार झाले आहेत. त्या सगळ्यांची ओळख पटल्याचेही त्यांनी सांगितले. हे सर्व गिर्यारोहक होते, ते डोंगरावर जात असतानाच ग्लेशियर तुटला. ११ गिर्यारोहक दगडांच्या आणि बर्फाखाली दबले गेले. इटलीतील डोलोमाइट पर्वतांतील मर्मोलडा ग्लेशियरचा हा भाग होता. एका मोठ्या बिल्डिंगच्या आकाराइतका हा ग्लेशियर होता.
रोम– ग्लोबल वॉर्मिंग (Global warming)ही दिवसेंदिवस मोठी समस्या होते आहे. याचाच परिणाम म्हणून जगात अनेक ठिकाणी हीट व्हेव, उष्णतेची लाट (Heat wave)पाहायला मिळाली. या वाढत्या उष्णतेमुळे ग्लेशियर (हिम नद) तुटण्याचे प्रकार वाढल्याचे दिसते आहे. एकाच आठवड्यात असे दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही घटना कळण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी नागरिक उपस्थित होते. त्यांनी ग्लेशियर (glacier)तुटतानाचे व्हिडिओ केले आहेत. यातली पहिली घटना ३ जुलै रोजी इटलीत घडली होती. शनिवारी इटलीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की इटलीत झालेल्या या दुर्घटनेत ११ जण ठार झाले आहेत. त्या सगळ्यांची ओळख पटल्याचेही त्यांनी सांगितले. हे सर्व गिर्यारोहक होते, ते डोंगरावर जात असतानाच ग्लेशियर तुटला. ११ गिर्यारोहक दगडांच्या आणि बर्फाखाली दबले गेले. इटलीतील डोलोमाइट पर्वतांतील मर्मोलडा ग्लेशियरचा हा भाग होता. एका मोठ्या बिल्डिंगच्या आकाराइतका हा ग्लेशियर होता.
I suppose there was nowhere to run to, but still! ?pic.twitter.com/3GE4M4YOxa
— James Withers (@scotfoodjames) July 10, 2022
ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद विरघळत आहेत
ज्या ठिकाणी ग्लेशियर तुटला तो भाग उन्हाळ्यात गिर्यारोहकांसाठी चांगली जागा मानण्यात येत असे. ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढते तापमान हे बर्फ तुटण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे हवामान वेज्ञानिक सांगत आहेत. सध्याच्या उन्हाळ्यात ग्लेशियर नेहमीपेक्षा जास्त विरघळत असल्याचे सांगण्यात येते आहे.
At least 11 hikers were killed in this ice avalanche of a melting glacier last week in Marmolada, Italy ??—this was the second glacial ice avalanche in a week. Let that sink in. #ClimateCrisis #ClimateEmergency pic.twitter.com/ZwtbnhzRdJ
— Eric Feigl-Ding (@DrEricDing) July 15, 2022
किर्गिस्तानमध्येही तुटला ग्लेशियर
इटलीत हिमनद पडल्याच्या घटनेनंतर काही दिवसांनी किर्गिस्तानमध्ये तियान शान डोंगररांगातही हिमस्खलनाचा प्रकार घडला. यात ९ ब्रिटिश नागरिकांसह १० जण अडकले. हा या आठवड्यातील सर्वात मोठा तुटलेला ग्लेशियर होता. हे सर्व जण ट्रेकिंगसाठी आले होते. यात एक अमेकिन, ९ ब्रिटीश असे ११ जण यात अडकले होते.या ग्रपुमध्ये समावेश असलेले हैरी गैमिन ग्लेशियर तुटल्याच्या आवाजानंतर त्या दिशेने गेले. त्यावेळी हिमनगाचा भाग मोठ्या लाटेसारखा येत असल्याचे त्यांना पाहायला मिळाले.