जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?

महाराष्ट्रात कोरोनानं दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे (Corona Deaths in World). भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.

जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?
Follow us
| Updated on: Mar 21, 2020 | 11:23 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनानं दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे (Corona Deaths in World). भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. देशात आणि जगात कोरोनाची स्थिती काय आहे? कोरोनाने जगभरात नेमकं कसं थैमान घालतंय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 85 हजाराहून अधिक आहे. यामुळे झालेल्या मृतांचा आकडाही 12 हजाराच्या आसपास गेला आहे. चीनमध्ये 81,008 कोरोना बाधित रुग्ण आहेत. असं असलं तरी चीनने तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आणली आहे. चीननंतर इटलीत कोरोनानं सर्वाधिक लोकांचा बळी घेतला आहे. इटलीत आतापर्यंत 47,021 कोरोनाचे रुग्ण आहेत. तिथंही लॉकडाऊन करण्यात आला आहे. इटलीनंतर नंबर येतो स्पेनचा. स्पेन युरोपातील दुसरा देश जिथं इटलीनंतर लॉकडाऊन झाला.

स्पेनमधील कोरोना रुग्णांची संख्या 24 हजार 926 इतकी आहे. युरोपमधील कोरोनाने प्रभावित आणखी एक देश म्हणजे जर्मनी. तिथं 20 हजार 705 रुग्णांची नोंद झाली आहे. इराण कोरोना रुग्णांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. तेथे 20 हजार 610  रुग्ण सापडले आहेत. पाकिस्तानमध्ये इराणमार्गेच कोरोनाचा शिरकाव झाल्याचंही बोललं जात आहे.

युरोपमधील बलाढ्य देशही कोरोनाचा शिकार

युरोपनंतर जगातील सर्वात बलाढ्य देश असणारा अमेरिकाही कोरोनापासून वाचू शकलेला नाही. अमेरिकेत आतापर्यंत 19 हजार 777 लोकांना कोरोनाची लागणी झाली. तिथं अमेरिकेनंतर फ्रान्समध्येही तशीच परिस्थिती आहे. फ्रान्समध्ये या घडीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 12,612 वर गेली आहे. चीनपासून सुरु झालेल्या कोरोनानं आता इटली आणि स्पेशसह युरोपाला सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत शुक्रवारपर्यंत सर्वाधिक 4,032 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. स्पेनमध्येही कोरोनानं 1,326 रुग्णांचा बळी घेतल्याचं समोर आलंय.

दरम्यान, कोरोना व्हायरसनं भारतातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. शनिवारी (21 मार्च) कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्र आणि केरळ राज्यात झाली. या दोन्ही राज्यांमध्ये मिळून नव्यानं 24 हून अधिक रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोरोनामुळे देशात 4 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

भारतात महाराष्ट्रात 64, केरळमध्ये 52, दिल्लीत 26, उत्तर प्रदेशमध्ये 24, तेलंगणामध्ये 21, राजस्थानमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकमध्ये 15, पंजाबमध्ये 13, लडाखमध्ये 13 रुग्ण आढळले आहेत. यात सातत्याने वाढ होत आहे. एकंदरीत, सध्या कोरोना व्हायरस हे अवघ्या जगाचं संकट बनल्याचं चित्रं आहे. आता जगासह भारतात आणि आपल्या महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळं प्रत्येकानं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.

Corona Deaths in World

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.