बलात्काराच्या घटनेनंतर चीनमध्ये बिझनेस ड्रिंकींग बंद करण्याची मागणी, पार्ट्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना दारुची जबरदस्ती

China Business Drinking : चिनी कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या चिनी महिलांना (Chinese Women) दारू पिण्यास भाग पाडले जाते. कधीकधी लोक या सक्तीचा फायदा घेतात, जसे सिनीअर मॅनेजर.

बलात्काराच्या घटनेनंतर चीनमध्ये बिझनेस ड्रिंकींग बंद करण्याची मागणी, पार्ट्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना दारुची जबरदस्ती
तरुण कर्मचारी वरिष्ठ सहकाऱ्यांना आदर देण्यासाठी दारू पितात.
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 2:27 PM

चीनमध्ये (China)बिझनेस ड्रिंकींग बंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याला कारण आहे, चीनच्या अब्जाधीश जॅक मा कंपनी (Alibaba Owner Jack Ma) अलिबाबाच्या एका वरिष्ठ व्यवस्थापकावर त्याच्या महिला साथीदारावर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून बिझनेस ड्रिंकिंगची चर्चा सुरू झाली. चिनी कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या चिनी महिलांना (Chinese Women) दारू पिण्यास भाग पाडले जाते. कधीकधी लोक या सक्तीचा फायदा घेतात, जसे सिनीअर मॅनेजर. त्यामुळे कार्यालयात दारू पिण्याची परंपरा रद्द करावी, अशी लोकांची मागणी आहे. ( Demand for ban on business drinking in China after rape, women workers forced to drink alcohol at parties )

महिलांना सक्ती केली जाते

याबाबत बीबीसीने एक माहिती प्रसिद्ध केली आहे, चीनच्या एका पीआर फर्ममध्ये काम करणाऱ्या एका महिलेने याबाबत सांगितलं आहे, तिच्या म्हणण्यानुसार ,तिला क्लायंटसोबत पार्टी करण्यास भाग पाडलं जातं. चीनमध्ये गुवान्सी (Guanxi) म्हणजेच वैयक्तिक संबंध बनवण्याचा ट्रेंड आहे. असे म्हटले जाते की व्यवसाय वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आदर मिळवण्यासाठी हे केलं जातं.

अलिबाबामध्ये नेमकं काय घडलं?

अलिबाबा कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आरोप केला की , तिला अशा ड्रिंकिंग पार्ट्यांमध्ये जावं लागायचं. एका पार्टीत ती दारू पिऊन बेशुद्ध झाली, तिच्या बेशुद्धीचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार झाला. महिला कर्मचाऱ्याने 11 पानांच्या पत्रात आपली आपबिती सांगितली आहे. पीडितेने सांगितलं की, तिच्या सिनिअरने तिला दारू पिण्याचा आदेश दिला. यानंतर हा सगळा प्रकार घडला. जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा ती नग्नावस्थेत होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेने दावा केला की, मॅनेजर त्या रात्री तिच्या खोलीत आला होता.

वरिष्ठांना नाही म्हणता येत नाही

चीनमध्ये ज्येष्ठतेची परंपरा आहे, म्हणूनच बॉसला नाही म्हणणं म्हणजे नोकरी गमावणं. यामुळे कर्मचारी बॉसच्या आदेशाला नकार देऊ शकत नाहीत. कर्मचाऱ्याला भीती वाटते की, जर त्याने नकार दिला तर त्याचं करिअर खराब होईल. यामुळेच कार्यालयात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.

पार्ट्यांमध्ये महिलांसमोर अश्लील विनोद

तरुण कर्मचारी वरिष्ठ सहकाऱ्यांना आदर देण्यासाठी दारू पितात. त्याचप्रमाणे, व्यावसायिक देखील आपल्या ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी असेच करतात. तडजोड करत महिला कर्मचाऱ्यांनाही या परंपरेत सामील व्हावं लागते. बळजबरीने त्या या पार्ट्यांमध्ये येतात. त्यातच लोक अशा पार्ट्यांमध्ये घाणेरडे विनोदही सांगतात, पण महिलांना नोकऱ्या वाचवण्यासाठी सर्व काही सहन करावे लागते. एवढेच नाही तर अनेक वेळा सिनिअर मॅनेजर्स ज्युनिअरना अधिक मद्यपान करण्यास भाग पाडतात, ज्यामुळे ज्युनिअर कर्मचारी नशेच्या आहारी जातात.

हेही वाचा:

Nobel Prize 2021: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, त्वचेवर संशोधन करणाऱ्या डेव्हिड ज्युलिअस, अर्डेम पटापौटियन यांना नोबेल पुरस्कार

फुमियो किशिदा जपानचे नवे पंतप्रधान, दिग्गज नेत्याला पराभूत करुन पंतप्रधानपदी विराजमान, मंत्रिमंडळातही नवे चेहरे!

 

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.