नॉस्ट्रॅडॅमसची ती भविष्यवाणी ठरली खरी? पोपच्या मृत्यूने जग दहशतीत, काय होतं भाकित ?
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर, प्रसिद्ध भविष्यवेत्ता नोस्ट्राडेमस यांची भाकितं पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहेत. असं मानले जाते की आज त्यांच्या प्रसिद्ध पुस्तक 'लेस प्रोफेसीज' मध्ये केलेल्या अनेक भविष्यवाण्यांपैकी एक खरी ठरली आहे.

कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे दीर्घ आजारामुळे (काल) 21 एप्रिल रोजी निधन झाले. व्हॅटिकन सिटीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी काल सकाळी 7.35 वाजता अखेरचा श्वास घेतला. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. “आज सकाळी रोमचे बिशप फ्रान्सिस त्यांच्या स्वर्गीय घरी परतले,” असे व्हॅटिकन कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करताना म्हटले.
266 वे पोप म्हणून काम पाहणारे पोप फ्रान्सिस हे व्हॅटिकन सिटीचे प्रमुख देखील होते. त्यांचे जन्माचे नाव जॉर्ज मारियो बर्गोलियो होते आणि ते 13 मार्च 2013 रोजी पोप म्हणून निवडले गेले. ते इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन आणि पहिले जेसुइट पोप होते, ज्यांनी करुणा, समानता आणि पर्यावरण संरक्षणाच्या त्यांच्या संदेशासाठी जगभरात मान्यता मिळवली.
का चर्चेत आली भविष्यवाणी ?
दरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या मृत्यूनंतर आता प्रसिद्ध अॅस्ट्रोलॉजर नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. नॉस्ट्रॅडॅमस यांची अनेक भाकीतं आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. त्यांनी 1555 साली लिहिलेल्या “लेस प्रोफेसीज” नावाच्या पुस्तकात कवितांच्या सहाय्याने अनेक प्रमुख घटनांसंदर्भात भाकीते वर्तवली होती. आता पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भाकिताबद्दल पुन्हा चर्चा सुरू झालीये. ‘लेस प्रोफेसीज’ मध्ये केल्या गेलेल्या अनेक भाकितांपैकी एक खरं झालं असल्याचं बोललं जातं आहे. यापूर्वी लंडनमध्ये लागलेली आग, हिटलरचा उदय , अमेरिकेतील 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि कोविड-19 महामारीबद्दल त्यांनी केलेली भाकितं खरी ठरताना दिसली होती.
नॉस्ट्रॅडॅमसने काय केलं होतं भाकीत ?
“एका अत्यंत वृद्ध पोपच्या मृत्यूनंतर, एक कमी वयाचा, तरूण रोमन (पदासाठी) निवडला जाईल. तो आपली गादी कमकुवत करत आहे, असं लोकं म्हणतील. पण तो थांबता, अविरतपणे पुढे जात राहील” असं भाकित नॉस्ट्रॅडॅमसने केलं होतं.
“पवित्र रोमन चर्चच्या शेवटच्या छळाच्या वेळी ‘रोमन पीटर’ नावाचा एक माणूस गादीवर बसेल होईल. तो त्याच्या अनेक संघर्षांमध्ये लोकांना घेऊन जाईल. जेव्हा ते सर्व संपेल, तेव्हा सात टेकड्यांच्या शहराचा नाश होईल आणि एक भयानक न्यायाधीश लोकांचा न्याय करेल.” असेही नॉस्ट्रॅडॅमसने नमूद केलं होतं.
तिसऱ्या महायुद्धाबद्दलही भाकीत केलं ?
नॉस्ट्रॅडॅमसने त्याच्या पुस्तकात तिसऱ्या महायुद्धाबद्दलही भाकीत केलं. त्यांनी लिहिले, “एका देशात, लोकांच्या क्रांतीमुळे एक नवीन नेता सत्ता हाती घेईल, दुसऱ्या देशात एक नवीन पोप बसेल आणि चीन चर्चविरुद्ध युद्ध करेल. नवीन धर्म (इस्लाम) इटली आणि फ्रान्सपर्यंत पोहोचेल, चर्चविरुद्ध गदारोळ माजेल आणि नंतर तिसरे महायुद्ध सुरू होईल.” असे त्यांनी लिहीलं होतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)