Donald Trump : ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी केला का हल्ला? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले उत्तर

Joe Biden Reaction : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचार सभेत हल्ला झाला. त्यावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे. काय म्हणाले बायडेन

Donald Trump : ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी केला का हल्ला? अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले उत्तर
काय म्हणाले जो बायडेन
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 12:09 PM

अमेरिकेत 13 जुलै रोजी शनिवारी, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याने निवडणुकीला गालबोट लागले. ते पेन्सिलवेनिया येथील प्रचार सभेत होते, त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला चाटून गोळी गेली. ट्रम्प हे धोक्याबाहेर आहेत. पण या हल्ल्यात एक नागरिक ठार झाला तर इतर दोन गंभीर जखमी असल्याचे समोर येत आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली.

गोळी लागताच कानाला हात

13 जुलै रोजी हा हल्ला झाला. ट्रम्प हे हल्लेखोराच्या निशाण्यावर होते. पण गोळी त्यांच्या उजव्या कानाला चाटून गेली. त्यानंतर लागलीच ट्रम्प यांनी कानाला हात लावला. त्यांच्या चेहऱ्यावर रक्त आले होते. त्यांना सुरक्षा रक्षकांनी तात्काळ कडे केले. सुरक्षित ठिकाणी नेले. त्यावेळी एकच गडबड उडाली. अनेक समर्थक जमिनीवर झोपले. तर काहींनी सुरक्षित जागी आश्रय घेतला. सुरक्षा यंत्रणा या घटनेची चौकशी आणि तपासात गुंतल्या आहेत. हल्लेखोर लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले जो बायडेन

या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. अमेरिकेत हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी विरोधी गोटातील उमेदवार ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी लागलीच ट्रम्प यांच्याशी संपर्क केला. त्यांची विचारपूस केली. ते आता सुरक्षित असल्याची माहिती घेतली. या हल्ल्याकडे सरकार गांभीर्याने पाहत आहे. अशा हल्ल्यांना अमेरिकेत स्थान नसल्याचे ते म्हणाले.

ट्रम्प यांना जीवे मारण्यासाठी हल्ला?

हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी दोन शूटरला टिपले. ट्रम्प यांनी सुरक्षा रक्षक आणि यंत्रणांच्या मदतीचे कौतुक केले. तर बायडेन यांनी पण सुरक्षा रक्षकांचे आभार मानले. त्यांनी राज्याच्या यंत्रणांना पण धन्यवाद दिले. ट्रम्प यांचा प्रचार निर्धोकपणे होईल, रॅली शांततेत होईल अशी आशा त्यांनी व्यक्ती केली. त्यांनी सुरक्षा यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला.

ट्रम्प यांना ठार मारण्यासाठी हा हल्ला करण्यात आला की, केवळ प्रचारात व्यत्यय आणण्याचा हा प्रयत्न होता, या प्रश्नाला बायडेन यांनी उत्तर दिले. ‘याविषयीची पुरेशी माहिती हाती आली नाही. तथ्य माझ्यासमोर नहीत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी माझ्याकडे योग्य माहिती असणे आवश्यक आहे. खात्रीलायक माहिती हाती आल्यावर मी त्यावर मत आणि टिप्पणी देईल.’ अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.