Trump Family : तीन लग्न, 5 मुलं; डोनाल्ड ट्रम्प यांची मुलं काय करतात?

Donald Trump : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात सध्या त्यांची पाच मुले आणि तिसरी पत्नी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वेळा लग्न केलंय. ट्रम्प यांनी त्यांचा व्यवसाय कसा उभा केला आणि त्यांची पाच मुले सध्या काय करतात जाणून घ्या.

Trump Family : तीन लग्न, 5 मुलं; डोनाल्ड ट्रम्प यांची मुलं काय करतात?
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:32 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. ते आता दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असतील. ट्रम्प हे त्याचे राजकीय जीवन, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. ट्रम्प यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेकदा वादात सापडले आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन वेळा लग्न केले असून त्यांना पाच मुले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाच मुलांची नावे डोनाल्ड जॉन ट्रम्प जूनियर, इव्हांका, एरिक, टिफनी आणि बॅरॉन अशी आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीचं नाव इव्हाना ट्रम्प होते. दुसरी पत्नी मारला मॅपल्स आणि सध्याची पत्नी मेलानिया ट्रम्प आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पाट मुले काय करतात जाणून घेऊया.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आईचे नाव मेरी आणि वडिलांचे नाव फ्रेडरिक ट्रम्प होते. त्यांच्या आईचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला होता तर वडील न्यूयॉर्कमध्ये जन्मले होते. मेरी आणि फ्रेडरिक यांना देखील पाच मुले होते. ज्यामध्ये ट्रम्प हे चौथे आहेत. ट्रम्प यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी असून एका भावाचा मृत्यू झालाय. ट्रम्प यांनी 1968 मध्ये व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी वडिलांच्या रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश केला. दोघांनी एकत्र काम करून आपल्या नावावाल ब्रँड बनवलं. ट्रम्प यांनी 2004 मध्ये ‘द अप्रेंटिस’ हा टीव्ही रिॲलिटी शो सुरू केला होता. खुद्द ट्रम्प यांनी याचे आयोजन केले होते.

डोनाल्ड जॉन ट्रम्प जूनियर

डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 एप्रिल 1977 रोजी मॉडेल इव्हानाशी पहिले लग्न केले होते. त्यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना इव्हाना, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, इवांका ट्रम्प आणि एरिक यांच्यासह तीन मुले आहेत. जॉन ट्रम्प जूनियर यांचा जन्म ३१ डिसेंबर १९७७ रोजी झाला. जॉन ट्रम्प ज्युनियर यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण बकले येथून झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो पेनसिल्व्हेनियातील द हिल बोर्डिंग स्कूलमध्ये गेला. त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बीएस (अर्थशास्त्र) मध्ये पदवी प्राप्त केली.

इव्हांका मेरी ट्रम्प

इवांका ही डोनाल्ड आणि दिवंगत इव्हाना ट्रम्प यांचे दुसरे अपत्य आहे. इवांकाचा जन्म 30 ऑक्टोबर 1981 रोजी झाला. इव्हांका मेरी ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन येथील क्राइस्ट चर्च आणि चॅम्पियन स्कूलमधून शिक्षण घेतले. यानंतर ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाले. इवांका ‘द अप्रेंटिस’मध्ये जज आणि मॉडेल देखील आहे.

एरिक फ्रेडरिक ट्रम्प

एरिक फ्रेडरिक ट्रम्प डोनाल्ड आणि इव्हाना यांचा धाकटा मुलगा आहे. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1984 रोजी झाला. एरिकने हिल स्कूलमधूनही शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन विद्यापीठातून फायनान्स आणि मॅनेजमेंटमध्ये बॅचलर पदवी पूर्ण केली.  आपल्या दोन्ही भावंडांप्रमाणे त्यांनीही ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये काम केले. वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी एरिकने त्याचा मोठा भाऊ जॉनसोबत एकत्र काम केले. डोनाल्ड आणि इव्हाना यांचा डिसेंबर 1990 मध्ये घटस्फोट झाला.

टिफनी एरियाना ट्रम्प

इव्हानापासून घटस्फोट घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मॉडेल मारला मॅपल्सशी दुसरे लग्न केले आणि दोघांना एक मुलगी आहे. टिफनी ही डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची दुसरी पत्नी मारला मॅपल्स यांची एकुलती एक मुलगी आहे. टिफनीने पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटरमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. डोनाल्ड आणि मार्ला यांचा 1997 मध्ये घटस्फोट झाला.

बॅरन ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जानेवारी 2005 रोजी मेलानियाशी लग्न केले. 2017 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मेलानिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी बनल्या. स्लोव्हेनियामध्ये जन्मलेली मेलानिया एक मॉडेलही राहिली आहे. डोनाल्ड आणि मेलानिया यांना बॅरन नावाचा मुलगा आहे. बॅरॉनने या वर्षी मे महिन्यात फ्लोरिडा येथील ऑक्सब्रिज अकादमी या खाजगी शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.