Donald Trump Rally Firing: फक्त 2 सेमीची चूक… अन्यथा ट्रम्प यांचा गेला असता जीव, सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटने…

Donald Trump Rally Firing: 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:15 वाजता, बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाला. एका संशयित शूटरने रॅली ठिकाणाच्या बाहेर उंच स्थानावरून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या.

Donald Trump Rally Firing: फक्त 2 सेमीची चूक... अन्यथा ट्रम्प यांचा गेला असता जीव, सिक्रेट सर्व्हीसच्या एजंटने...
Donald Trump
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 8:45 AM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेदरम्यान हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागली. ही गोळी 2 सेंटीमीटरनेही आत गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. डोनाल्ड ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे निवडणूक रॅलीला ट्रम्प संबोधित करत असताना गोळीबार झाला. त्यानंतर गर्दीत आरडाओरडा सुरु झाली. लोक इकडे तिकडे धावू लागले. सिक्रेट सर्व्हिस एजंट्सनी लगेच ट्रम्प यांना घेरले. सिक्रेट सर्व्हिस एजंटने मुव्ह, मुव्ह करत ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षा तयार केली.

सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवले

ट्रम्प भाषण देत असताना अचनाक त्यांना कानाजवळून काही गेल्याचे समजले. ते खाली वाकले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी व्यासपीठावर धाव घेतली. गर्दीत आरडाओरडा सुरू झाली. सिक्रेट सर्व्हिस कमांडोंनी ट्रम्प यांना घेरले. ट्रम्प उठतातच मुठ आवळताना दिसतात. यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर आणि कानाखाली रक्त दिसत होते. ताबडतोब सुरक्षा रक्षकांनी ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवले. त्यांना कारमध्ये बसवले आणि घटनास्थळावरुन दूर नेले.

हे सुद्धा वाचा

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवेदन

घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले की, ‘मी युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. त्यांनी गोळीबारानंतर तातडीने कारवाई केली. रॅलीत मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती आणि जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो. आपल्या देशात असे कृत्य घडू शकते, यावर माझा विश्वास बसत नाही. हल्लेखोराबद्दल मला काहीही माहिती नाही. माझ्या उजव्या कानाला गोळी लागली. मला काहीतरी गडबड आहे, हे लक्षात आले.

सिक्रेट सर्व्हिसचे निवेदन

सिक्रेट सर्व्हिसने नुकतेच एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हल्लेखोराने एका उंच ठिकाणाहून ट्रम्प यांच्या दिशेने अनेक राऊंड फायर केले. त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीला ठार करण्यात आले. तसेच इतर दोघे गंभीर जखमी आहे.

सिक्रेट सर्व्हिसने निवेदनात पुढे म्हटले आहे की, “13 जुलै रोजी संध्याकाळी 6:15 वाजता, बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाला. एका संशयित शूटरने रॅली ठिकाणाच्या बाहेर उंच स्थानावरून स्टेजच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. शूटरला यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंटने ठार केले. डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.”

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.