Russia Ukraine war: रशिया-यूक्रेन युद्ध थांबणार? जेलेंस्कीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना फोन, ‘युरोपमध्ये आमचे सैन्य…’
russia ukraine war: मागील आठवड्यात रशियामधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले होते, ट्रम्पसोबत चर्चा करणे चुकीचे नाही. जर दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले होत असतील तर मी त्या चर्चेच्या विरोधात नाही.
Russia Ukraine war: गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होत आहे. आता अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवल्यानंतर रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांना फोन केला. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील संघर्ष वाढवू नये, असा सल्ला दिला. युरोपमध्ये आमचे सैन्य असल्याची आठवण करुन दिली. अमेरिकेची सूत्र डोनाल्ड ट्रम्प हाती घेणार आहे. त्यामुळे आता रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युक्रेन-रशिया संघर्ष थांबणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपीत पुतिन यांच्याशी चर्चा केली. अमेरिका-रशिया संबंध आणि राशिया-युक्रेन युद्ध याबाबत ही चर्चा झाली. यावेळी युक्रेन-रशिया संघर्ष टाळण्याचा सल्ला दिला. त्यापूर्वी ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्कीसोबत चर्चा केली होती. जेलेंस्की यांना युद्ध थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
असा असणार तोडगा
राष्ट्रध्यक्ष निवडणुकी दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवणार असल्याचे म्हटले होते. परंतु त्यासंदर्भातील माहिती दिली नव्हती. आता ट्रम्प यांच्याजवळच्या लोकांनी सांगितले की, जो भूभाग रशियाने ताब्यात घेतला आहे, तो रशिया आपल्याकडे ठेवेल. ट्रम्प आणि पुतिन यांच्या चर्चेत या पद्धतीने ट्रम्प यांनी संवाद साधल्याचे म्हटले जात आहे.
मागील आठवड्यात रशियामधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पुतिन म्हणाले होते, ट्रम्पसोबत चर्चा करणे चुकीचे नाही. जर दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले होत असतील तर मी त्या चर्चेच्या विरोधात नाही. ट्रम्प एक धाडसी व्यक्ती आहे. जुलैमध्ये त्यांचा हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःला कसे हाताळले याने मी प्रभावित झाल्याचे सांगितले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर रोजी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर जेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली. जेलेन्स्कीने युक्रेनला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला नाही. या दूरध्वनी वरील चर्चे दरम्यान, जेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन केले.