US Election Results 2024 : ट्रम्प जिंकताच इराणला पहिला फटका, आता पुढे अजून काय-काय होणार?

US Election Results 2024 : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच चित्र स्पष्ट झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली आहे. ते चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. कमला हॅरिस पराभूत झाल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय ही इराणसाठी धोक्याची घंटा आहे. त्याची त्यांना प्रचिती यायला सुरुवात झाली आहे.

US Election Results 2024 : ट्रम्प जिंकताच इराणला पहिला फटका, आता पुढे अजून काय-काय होणार?
Trump Win Impact on Iran
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 4:29 PM

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय पक्का झाला आहे. अमेरिकेत होत असलेल्या या बदलाचा इराणवर खूप वाईट परिणाम होत असल्याच दिसत आहे. इराणची करन्सी आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तराला जाऊन पोहोचली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा इराणसाठी चांगले संकेत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मागच्या कार्यकाळातही इराणवर अनेक प्रतिबंध लादले होते. ते इस्रायलचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी खुर्ची संभाळताच इराणचे वाईट दिवस सुरु झालेत. इराणची मुद्रा रियाल बुधवारी आतापर्यंतच्या आपल्या सर्वात खालच्या स्तराला पोहोचली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात सत्तेवर येताच इराण विरुद्ध अनेक पावलं उचलली होती. इराणने 2015 साली अमेरिकेसोबत अणवस्त्र करार केला होता. ट्रम्प यांनी 2018 साली तो करार मोडला. इराणवर कठोर प्रतिबंध लादले. त्यांची आर्थिक स्थिती कमजोर केली. 2015 साली एका डॉलरच्या तुलनेत इराणी रियालचा दर 32,000 डॉलर होता. नुकत्याच आलेल्या निकालानंतर एका डॉलरच्या तुलनेत रियालचा दर 7,03,000 पर्यंत पोहोचला आहे.

आता इस्रायल काय करणार?

सध्या अमेरिकेचा जवळचा सहकारी इस्रायलची गाजामध्ये हमास आणि लेबनानमध्ये हिज्बुल्लाहसोबत लढाई सुरु आहे. तिथे अमेरिका सैन्य आणि आर्थिक बळावर इस्रायलची मदत करत आहे. इराणने इस्रायलभोवती दहशतवादी गटांच जाळ उभारलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान युद्ध थांबवण्याच आश्वासन दिलं आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार ट्रम्प यांच्या विजयानंतर इस्रायलला रोखणं कठीण होऊन बसेल. त्यामुळे मध्य पूर्वेत मोठ नुकसान होईल.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.