आमच्याशी पंगा घेऊ नका जगात जिथे असाल तिथे घुसून मारु, इस्रायलचा भारतातून थेट इशारा

गेल्या एक वर्षापासून इस्रायलला इराण आणि त्याच्या प्रॉक्सी सैन्याकडून दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये गाझा, हुथी बंडखोर, येमेन आणि इतर प्रॉक्सी गटांचा समावेश आहे. यावेळी इस्रायलने थेट इशारा दिला आहे. इस्रायलने म्हटलं की, आमच्यासोबत पंगा घेऊ नका. जिथे असाल तिथे मारु.

आमच्याशी पंगा घेऊ नका जगात जिथे असाल तिथे घुसून मारु, इस्रायलचा भारतातून थेट इशारा
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 11:56 PM

इस्रायल सध्या हिजबुल्लाह आणि हमासच्या विरोधात कारवाई करत आहे. त्यातच इस्रायलचे भारतातील महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी शनिवारी सांगितले की, इस्रायल मध्य पूर्वेतील दहशतवाद आणि त्याच्या प्रॉक्सी सैन्याविरुद्ध कठोर पावले उचलत आहे. इस्रायलने अलीकडेच इराणमधील अनेक लष्करी तळांवर अचूक हल्ले केले आहेत. कोबी शोशानी यांनी स्पष्ट केले की, इस्रायली सैन्य केवळ लष्करी तळांनाच लक्ष्य करत आहे, पण त्यांचे शत्रू नागरी वस्तींना लक्ष्य करतात.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत शोशानी म्हणाले की, इस्रायलसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान हमासने ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडवणे आहे. “आम्हाला याची चिंता आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इस्रायलचे काही मित्र हमासशी चर्चा करत आहेत. आमच्या काही अटी आहेत, त्यापैकी एक म्हणजे हमासकडे कोणतीही लष्करी क्षमता नसावी.” ते असेही म्हणाले की इस्रायलला लेबनॉनमध्ये एक सुरक्षा क्षेत्र बनवायचे आहे ज्यातून हिजबुल्लाहने माघार घ्यावी आणि त्या देशाचे सैन्य तैनात केले जावे.

इराणवरील हल्ल्यांबाबत चर्चा करताना शोशानी म्हणाले की, त्यांचे निकाल लवकरच समोर येतील. संदेश अगदी स्पष्ट आहे – आमच्या विश्वासार्हतेशी जुगार खेळू नका. इस्त्रायल मध्य पूर्वेतील कोणत्याही भागात, जवळ किंवा दूर असले तरीही अचूक लक्ष्य करू शकते.” मध्यपूर्वेत सुरक्षा आणि शांतता राखणे हा इस्रायलचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

ते म्हणाले की, “आमच्या आणि आमच्या शत्रूंमध्ये हा फरक आहे. आम्ही केवळ लष्करी ठिकाणांन लक्ष्य केले, नागरीकांना नाही. हे ऑपरेशन अत्यंत अचूक होते आणि केवळ इराणमधील लष्करी लक्ष्यांना लक्ष्य केले गेले. आमच्या दृष्टीने, हे इराणचे प्रकरण आता संपले आहे, आणि आम्हाला आशा आहे की ते बदला घेण्याची चूक करणार नाहीत.”

शोशानी पुढे म्हणाले की, गेल्या एक वर्षापासून इस्रायलला इराण आणि त्याच्या प्रॉक्सी सैन्याकडून दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये गाझा, हुथी बंडखोर, येमेन आणि इतर प्रॉक्सी गटांचा समावेश आहे. इस्रायलचे ध्येय स्पष्ट आहे – मध्यपूर्वेत शांतता आणि सुरक्षा राखणे.

Non Stop LIVE Update
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन.
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?
'अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर...,' काय म्हणाले थोरात ?.
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?
वसंत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई होणार? पोलीस अधिक्षक काय म्हणाले?.
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल
थोरात आणि विखे समर्थकांच्या संगमनेरमधील राड्याची केंद्राकडून दखल.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्यं अतिशय किळसवाणं - रोहित पाटील.
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.