MODI US Visit : आधी उद्योगपतींची भेट, नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत बैठक, असा असेल पंतप्रधान मोदींचा US दौऱ्यातील पहिला दिवस!

PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान मोदी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा करणार आहेत.

MODI US Visit : आधी उद्योगपतींची भेट, नंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत बैठक, असा असेल पंतप्रधान मोदींचा US दौऱ्यातील पहिला दिवस!
2014 ला पंतप्रधान बनल्यानंतर तब्बल सातव्यांदा मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:36 AM

वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) क्वाड देशांच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी रात्री मोदी वॉग्शिंग्टनमध्ये दाखल झाले. त्यांच्या दौऱ्याचा आज पहिला दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा करणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबतची भेट खास असणार आहे, कारण, यावेळी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील विविध मुद्द्यांवर बातचीत होणार आहे. विशेष करुरन विज्ञान आणि औद्योगिकी क्षेत्रात संबंध दृढ करण्यावर भर असेल. याशिवाय मोदी आज काही महत्त्वाच्या उद्योगपतींची भेट गेतील आणि त्यांना भारतात गुंतवणूक करण्याबाबत प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतील.

2014 ला मोदी पंतप्रधान बनल्यानंतर तब्बल सातव्यांदा ते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा हा 3 दिवसांचा दौरा आहे. सूत्रांनी दिलेला माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या दिवसाची सुरुवात उद्योगपतींच्या भेटीपासून करणार आहे. या उद्योगसमुहांमध्ये क्वालकॉम, एडोब, ब्लॅकस्टोन, जनरल एटॉमिस्ट आणि फर्स्ट सोलार यांच्या प्रमुखांचा समावेश असेल.

कंपन्यांसोबत बैठक कशासाठी?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक घेणार आहेत, या अशसाा कंपन्या आहे, ज्या त्यांच्या क्षेत्रात निपूण आहेत, आणि ज्या भारतात गुंतवणूक करु इच्छित आहेत. या कॉर्पोरेट कंपन्या तंत्रज्ञान, आयटी सेक्टर, डिफेन्स सेक्टर आणि अक्षय उर्जा निर्मिती करतात. एकूणच भारताला हव्या असलेल्या सर्वच तंत्रज्ञानाचं मिश्रण या बैठकीत साधण्याचा प्रयत्न असणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट

कॉर्पोरेट जगतातील सीईओंशी बैठक उरकल्यानंतर, पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australian PM Scott Morrison) यांची भेट घेणार आहेत. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार,’ दुपारी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतील. दोन्ही पंतप्रधान याआधीही अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर भेटले आहेत, स्कॉट मॉरिसन यांनी काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना फोन केला होता, आणि AUKUS एलायंस योजनेची माहिती दिली होती. ‘

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ही भेट कित्येक दिवसांपासून पुढे ढकलली जात होती, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन याआधी जानेवारी महिन्यात भारत दौरा करणार होते, मात्र त्यांना येता आलं नाही. त्यानंतर मे 2020 मध्ये भारत दौऱ्याचं ठरलं होतं, पण कोरोनामुळे हाही दौरा रद्द करावा लागला ‘

मोदी-बायडन भेटीवर सर्वांच्या नजरा

24 सप्टेंबर म्हणजेच उद्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांची भेट होणार आहे. 20 जानेवारीला बायडन यांनी अमेरिकेचं राष्ट्रपतिपद स्वीकारलं, त्यानंतर मोदींसोबतची त्यांनी ही पहिली व्यक्तीगत भेट असेल. बायडन यावेळी जागतिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील, शिवाय अफगाणिस्तानातील परिस्थितीत, कट्टरतावादाचा सामना, सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया यावरही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

कमला हॅरिस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची भेट घेणार आहे. या भेटीत भारत-अमेरिका संबंध अजून दृढ करण्यावर चर्चा होऊ शकते, अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,’ आम्ही उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी 1 तासाचा वेळ घेतला आहे. या चर्चेत दोन्ही देशांच्या हिताबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ज्यात कोरोनाचं उच्चाटन, तांत्रिक आणि अंतराळ क्षेत्रात मदतीसह अनेक मुद्दे सामील असतील ‘

क्वाड शिखर संमेलनात कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

क्वाड देशांच्या शिखर संमेलनात राष्ट्रपती बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासह पंतप्रधान मोदी सहभागी आहेत. पंतप्रधान मोदींनी हा दौरा सुरु करण्यापूर्वी म्हटलं होतं, की हा दौरा जापान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या तिन्ही देशांसोबत संबंध मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अमेरिका यंदा क्वाड बैठकीचं आयोजन करत आहे, याद्वारे हिंदी आणि पॅसिफिक महासागरात चीनच्या कुरघोड्यांना थांबवण्याचं काम होणार असल्याचं मत तज्ञांचं आहे.

आपल्या दौऱ्यादरम्यान मोदी, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत, यामध्ये जागतिक मुद्द्यांना ते हात घालतील, ज्यात कोरोना संकट, दहशतवाद, जागतिक तापमानवाढ आणि इतर मुद्द्यांचा समावेश असेल

हेही वाचा:

PM Narendra Modi US visit : एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत, पाहा 5 फोटो

PM Narendra Modi America visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना, तीन मुद्द्यावर चर्चा अपेक्षित

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.