Greece Earthquake: ग्रीसमध्ये महाकाय भूकंपाचा धक्का, महिनाभरात दुसरा भूकंप, जीवितहानीची माहिती नाही
भूकंपाची तीव्रता 6.3 होती आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व क्रेतेच्या झाक्रोस व्हिलेजपासून (Zakros Village) सुमारे 23 किमी पूर्व समुद्रात होता. विशेष गोष्ट म्हणजे, या भूकंपाच्या 3 आठवड्यांपूर्वी एक शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यामध्ये बेटावर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता
ग्रीसच्या (Greece) क्रीट बेटावर (Crete island) मंगळवारी पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंप झाला. गेल्या महिनाभरात आलेला हा दुसरा भूकंप आहे. सध्यातरी कोणत्याही नुकसानीची माहिती मिळाली नाही. (Athens Geodynamic Institute)अथेन्स जिओडायनामिक इन्स्टिट्यूटने सांगितले की, भूकंपाची तीव्रता 6.3 होती आणि त्याचा केंद्रबिंदू पूर्व क्रेतेच्या झाक्रोस व्हिलेजपासून (Zakros Village) सुमारे 23 किमी पूर्व समुद्रात होता. विशेष गोष्ट म्हणजे, या भूकंपाच्या 3 आठवड्यांपूर्वी एक शक्तिशाली भूकंप झाला होता, ज्यामध्ये बेटावर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि शेकडो इमारतींचे नुकसान झाले होते. (Earthquake in Greece: Magnitude 6.3 earthquake jolts Greek island of Crete)
यूरोपियन मेडिटेरेनियन सीस्मोलॉजिकल सेंटर (European Mediterranean Seismological Centre) च्या केंद्राच्या म्हणण्यानुसार हा भूकंप समुद्रात (Earthquake) दोन किमी खोलीवर होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाला मदतीसाठी तत्काळ फोन आला नाही. एका ग्रीक भूकंपशास्त्रज्ञाने सांगितले की मंगळवारचा भूकंप एका भूर्गभातल्या बिघाडामुळे झाला असावा. बेटावर आलेल्या या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत कुणीही जखमी किंवा आर्थिक नुकसानीची नोंद झालेली नाही. दरम्यान, आधीच्या भूकंपानंतर लोकांनी इथली घरं रिकामी केली होती.
आधी सप्टेंबर महिन्यात बेटावर 5.8 तीव्रतेचा भूकंप
याआधी, 27 सप्टेंबर रोजी दक्षिण ग्रीसमधील क्रीट बेटावर आणखी एक शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल होती. यामुळे लोकांना आपली घरे सोडून पळून जावे लागले. अथेन्स जिओडायनामिक इन्स्टिट्यूटने नोंदवले आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू आर्वीच्या 23 किमी वायव्येस 10 किमी खोलीवर होता.
अर्कलोहोरी शहराच्या महापौरांनी स्काय टीव्हीला सांगितले की, गावातील दोन चर्च आणि इतर इमारतींचे नुकसान झाले आहे, शिवाय दोन लोक अडकले आहेत. चर्चमध्ये देखभाल कामादरम्यान घुमट कोसळल्यानंतर अडकलेल्यांपैकी एक घुमटाखाली अडकला आणि दुसरा एका घरात अडकला. ग्रीसमध्ये मोठ्या भूकंपाचा इतिहास आहे.
हेही वाचा:
Lebanon Electricity Blackouts: इंधन संपलं, अख्खा देश ब्लॅकआऊट, लेबनानमध्ये वीज प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी पैसाच नाही!
पाकच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर खान यांचं निधन; एका रात्रीत ठरलेले हिरो