Japan Earthquake : जपान भूकंपानं हादरला, 7.1 तीव्रतेचा झटका, त्सुनामीची पण भीती
Japan Tsunami Alert : जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं. रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. एक संकट कमी होत की आता त्सुनामीची भीती व्यक्त होत आहे. जपानमधील मियाझाकी परिसर यामुळे हादरला. नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.
जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी परिसराला बसले आहेत. जपानच्या किनारी पट्टीवरील मियाझाकी, कोची, इहिमे, कागोशिमा आणि आहता या भागांना त्सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांन सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
भूंकपाने केली नवीन वर्षाची सुरुवात
या नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी भूंकपाने जपानला हादरवले होते. 2 जानेवारी रोजी 7 तासात तब्बल 60 भूंकपाने जपानची भूमी हादरली. तर त्याचवेळी त्सुनामीचा धोका पण आला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. त्यावेळी जवळपास 1 लाख नागरिकांना किनारपट्टीहून सुरळीत स्थळी हलवण्यात आले होते.
इमारत बांधण्यासाठी भूकंप नियमावली
ग्रेट कांटो भूंकप 1923 मध्ये आला होता. त्यात टोकियोला मोठा फटका बसला होता. या अपघातानंतर जपानचा पहिला भूकंप प्रतिरोधक बिल्डिंग कोड तयार करण्यात आला. इमरातीत स्टील आणि काँक्रीटचा वापर सुरु झाला. लाकडी इमारतीसाठी जाड खांब अनिवार्य करण्यात आला. भूंकप आला की इमारतीसाठी नवीन नियमावली तयार करण्यात येते. त्याआधारे बदल होतो.
का येतो भूंकप?
पृथ्वीच्या उदरात सात टेक्टोनिक प्लेट्स आहे. या प्लेट्स सातत्याने फिरत असतात. जेव्हा या चकत्या आपआपसात भिडतात, घासतात वा एकमेकांवर अधिक्रमण करतात अथवा दूर जातात तेव्हा जमीन हादरते. त्यालाच भूंकप म्हणतात. भूंकपाचे मोजमाप रिश्टर स्केलमध्ये करण्यात येते. त्याला रिक्टर मॅग्निट्यूड स्केल असे म्हटल्या जाते.
रिक्टर मॅग्निट्यूड स्केल हा 1 ते 9 पर्यंत असतो. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रापासून म्हणजे एपीसेंटरपासून मोजली जाते. त्या केंद्रातून निघणारी ऊर्जा या स्केलवर मोजल्या जाते. 1 म्हणजे अगदी कमी तीव्रतेची ऊर्जा निघते. 9 मध्ये सर्वाधिक तीव्रता असते. हा भूकंप अत्यंत भीषण आणि नुकसानदायक असतो. या तीव्रतेच्या भूकंपाचा जवळपास 40 किलोमीटर परिसरात परिणाम दिसतो. या भागाला झटके बसतात. या धक्क्यामुळे मोठे मोठे पूल, इमारती धराशायी होतात. तर किनारपट्टीवर त्सुनामीचा मोठा धोका असतो.