कोण कुणावर भारी? इराण की इस्रायल?; एकाकडे तेल तर दुसऱ्याकडे तंत्रज्ञान; आर्मी किती?

जगातील दोन महत्त्वाचे देश सध्या एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत. इराण आणि इस्रायल दरम्यान मोठं युद्ध सुरू झालं आहे. हे युद्ध घनघोर होईल अशा वळणावर आहे. त्यामुळे जगाला चिंता वाटायला लागली आहे. विशेष म्हणजे दोन्ही देशावर जगातील अनेक देश अवलंबून आहेत. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. त्यातच दोन्ही देशांकडे आर्मी आणि शस्त्रसाठाही तुल्यबळ असल्याने जगाला टेन्शन आलं आहे.

कोण कुणावर भारी? इराण की इस्रायल?; एकाकडे तेल तर दुसऱ्याकडे तंत्रज्ञान; आर्मी किती?
iran and israelImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 2:55 PM

इराण आणि इस्रायलमध्ये आता युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देश एकमेकांच्या मागे हात धुवून लागले आहेत. इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर 200 हून अधिक मिसालईलचा मारा केला. इस्रायलच्या सैन्य तळांवरच मुख्यत्वे हा मारा करण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये एकच हल्लकल्लोळ उडाला आहे. सर्व लोक झोपेत असताना झालेल्या या हल्ल्याने आजची सकाळ इस्रायलसाठी शॉकिंग ठरली आहे. इराणने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. तर तिकडे इस्रायलनेही बदला घेण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. पण ते कधी द्यायचं हे आम्हीच ठरवू, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इस्रायल आणि इराणच्या या वादाने मध्य पूर्वेत महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय घडलं?

मंगळवारी रात्री इरानने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलचा मारा केला. तेल अवीवमध्ये 200 हून अधिक मिसाइल डागले गेले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. इराणने या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. हिजबुल्लाहचा चीफ नसरल्लाह याचा इस्रायलने खात्मा केला. त्यामुळे आम्ही या हत्येचा बदला घेतला आहे, असं इराणने म्हटलं आहे. ही लढाई पुढेही सुरूच राहणार असल्याचंही इराणने स्पष्ट केलं आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये रेड सायरन वाजत आहेत. लोक जीव वाचवण्यासाठी शेल्टरच्या दिशेने गेले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे प्रचंड चिडले आहेत. इराणला आपल्या कृत्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच नेतन्याहू यांनी दिला आहे. लेबनान सरकारच्या दाव्यानुसार, इस्रायलने या आधी आमच्यावर हल्ला केला. त्यात 1000 हून अधिक लोक मारले गेले. तर 10 लाख लोक घर सोडायला मजबूर झाले.

iran and israel

iran and israel

इराण आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी झाली नाही आणि हे महायुद्ध भडकतच गेलं तर त्याचा शेवट काय होईल हे सांगता येत नाही. कारण दोन्ही देशांकडे शस्त्रसाठ्यापासून ते सैन्यबळापर्यंतचा मोठा लवाजमा आहे. शिवाय दोघांकडे अण्वस्त्रही आहेत. त्यामुळे कुणाचा निक्काल लागेल हे आताच सांगता येणं शक्य नाही. तरीही या दोन्ही देशाची बलस्थानं काय आहेत? कुणाकडे किती आर्मी आणि शस्त्रसाठा आहे, याचा घेतलेला हा आढावा…

इराणची ताकद किती?

इराणची लोकसंख्या :

इराणची लोकसंख्या इस्रायलपेक्षा दहापट अधिक आहे. ग्लोबल फायरपॉवरच्या 2024च्या इंडेक्सनुसार इराणची लोकसंख्या 8,75,90,873 होती.

आर्मी :

इराणची लोकसंख्या ही 9 कोटीच्या आसपास आहे. इराणचा एकूण जीडीपी 413 बिलियन डॉलर आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडिजच्यानुसार इराणचं संरक्षण बजेट 7.4 बिलियन डॉलर आहे. म्हणजे जीडीपीच्या दोन टक्क्याच्या आसपास संरक्षण बजेट आहे. इराण जगातील 14 वी सर्वात मोठी मिलिट्री शक्ती आहे. मिडल ईस्टमध्ये सर्वाधिक सैन्यबळ इराणकडेच आहे. त्यांच्या सैन्यात 580000 सैनिक आहेत. आणि 2 लाख राखीव दल आहे. दोन्हीची संख्या मिळून इराणची लष्करी संख्या 780000 एवढी होते.

शस्त्र :

इराणची सर्वाधिक मोठी ताकद म्हणजे त्यांचे बॅलेस्टिक मिसाईल आहेत. अमेरिकेच्या गुप्तवार्ता विभागाच्या एका रिपोर्टनुसार, संपूर्ण मध्यपूर्वेत बॅलेस्टिक मिसाईल असलेला इराणच एकमेव देश आहे. बीबीसीच्या एका वृत्तानुसार, 1980च्या दशकात शेजारील देश इराक विरुद्धच्या लढाईवेळी इराणने आपल्या मिसाईल सिस्टिमचा वापर करणं सुरू केलं. त्यानंतर पुढच्या दशकभरात त्यांनी छोट्या टप्प्याचा वेध घेणारी शेकडो मिसाईल्स डेव्हल्प केली.

iran and israel

इराणकडे सेजिल नावाचं एक मिसाईल आहे. हे मिसाईल ताशी 17000 किलोमीटर प्रतिवेगाने 2500 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं. याच प्रमाणे खैबर मिसाईलची रेंज ही 2000 किलोमीटर एवढी आहे. हज कासेम मिसाईल सुद्धा 1400 किलोमीटर रेंजपर्यंत जाऊ शकते. इराणकडे केएच-55 सारख्या क्रूझ मिसाइल आहेत. या मिसाइल अण्विक क्षमतेने सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. हे मिसाइल आपल्यासोबत 3000 किलोमीटरपर्यंत अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतात, असंही सांगितलं जात आहे.

हायपरसोनिक मिसाइल :

इराणने यावेळी इस्रायलवर ज्या हायपरसोनिक मिसाइलने हल्ला केला होता, ते मिसाइल इराणने गेल्यावर्षी जूनमध्ये जगासमोर मांडलं होतं. आवाजाच्या वेगाच्या तुलनेत हे मिसाइल पाच पट अधिक वेगाने चालतं. त्याला इंटरसेप्ट करणं फारच कठिण आहे. या शिवाय इराण हा देश मध्यपूर्वेतील ड्रोनचा प्रोड्यूसर म्हणूनही ओळखला जातो. इराणकडे Mohajer-10 नावाचे ड्रोन आहे. हे ड्रोन 2000 किलोमीटर वेगाने जाऊ शकते. तसेच 200 किलो वजनी हत्यारही सोबत घेऊन जाऊ शकते.

एअरफोर्स आणि नेव्ही :

इराणकडे 273 फायटर जेट आणि लढाऊ एअरक्राफ्ट आहेत. त्याशिवाय 50 हून अधिक हेलिकॉप्टर, 240 ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर, 1783 टँक, 572 फुलप्रुफ वाहने आहेत. इस्रायलच्या तुलनेत इराणची नौसेना आधुनिक नाहीये. पण त्यांच्याकडे 220 जहाज आहेत. तर इस्रायलकडे फक्त 60 जहाज आहेत.

अण्वस्त्र :

इराणकडे अण्वस्त्र आहेत, असा दावा केला जातोय. पण इराणने कधीच यावर भाष्य केलं नाही. तसेच या वृत्ताला कधी दुजोरा दिला नाही. कधी त्यांनी अण्वस्त्र चाचणी केल्याचंही समोर आलं नाही.

iran and israel

iran and israel

अर्थव्यवस्था :

अर्थव्यवस्थेच्या तुलनेत इराण इस्रायलपेक्षा थोडा कमकुवत आहे. 2024मध्ये इराणची जीडीपी $388.84 बिलियन राहण्याची शक्यता आहे. इराणच्या अर्थव्यवस्था आणि कमाईचा सर्वात मोठा स्त्रोत तेल आणि नैसर्गिक गॅसचे भंडार आहे. इराण नॅचरल गॅसच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑईल रिझर्व्ह करण्यात चौथ्या नंबरवर आहे. इराण जगातील अनेक देशांना तेल आणि नॅचरल गॅसची निर्यात करतो.

इस्रायल किती शक्तीमान?

इस्रायलची लोकसंख्या

इस्रायलची लोकसंख्या 90,43,387 आहे.

आर्मी :

ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, इस्रायलची आर्मी जगातील 20 वी सर्वात मोठी ताकद आहे. इस्रायली सैन्यात 169,500 सक्रिय सैनिक आहेत. तर 465,000 रिज़र्व यूनिट आहेत. म्हणजे इस्रायलकडे एकूण 634500 सैनिक आहेत. याबाबतीत इराण मागे आहे. इस्रायलचा संरक्षण बजेट इराणच्या तुलनेत 7 पट अधिक आहे.

शस्त्र :

इस्रायलची डिफेन्स सिस्टीम आणि शस्त्रांचा विचार करता आयरन डोम आणि डेव्हिडन्स स्लिंग सारख्या एअर डिफेन्स सिस्टिम त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. लांब पल्ल्याच्या आणि अत्यंत जवळच्या अंतरावरील मिसाइल, ड्रोन आणि रॉकेट हवेतच उडवून देण्याची त्यांची क्षमता आहे. त्याशिवाय इस्रायलकडे 1200 तोफखाने, मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टिम आणि स्मार्ट बॉम्ब हत्यारे आहेत. या शस्त्रांद्वारे टार्गेटवर अचूक निशाणा साधला जातो.

एअरफोर्स आणि नेव्ही :

ग्लोबल फायर पॉवरच्या रिपोर्टनुसार, इस्रायली आर्मीजवळ कमीत कमी 241 लढाऊ जेट, 48 लढाऊ हेलिकॉप्टर आणि 2200च्या जवळपास टँक आहेत. इस्रायलच्या नेव्हीत कमीत कमी सात युद्धपोत आणि सहा पाणबुडी आहेत. अण्विक हत्यार घेऊन जाणे आणि लॉन्च करण्यात या युद्धपोत आणि पाणबुडी सक्षम आहेत. टार्गेट ठरवून मारण्यात माहीर असलेली मोसाद ही गुप्तचर संस्था इस्रायलची सर्वात मोठी ताकद आहे.

iran and israel

iran and israel

अण्वस्त्र :

इस्रायलकडे कमीत कमी एक डझन अण्वस्त्र आहेत. आपल्याकडे न्युक्लिअर वेपन्स आहेत, हे इस्रायलने कधीच सांगितलं नाही. पण डिफेन्स एक्सपर्ट आणि थिंक टँकने त्याची पृष्टी केली आहे.

अर्थव्यवस्था :

वर्ल्ड बँकेच्या आकड्यानुसार, 2023मध्ये इस्रायलची जीडीपी 509.90 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. या वर्षी जीडीपी 535 बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. ग्लोबल इकोनॉमित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेची 0.48 टक्क्याची भागिदारी आहे.

iran and israel

iran and israel

कृषी, बांधकाम, ट्रान्स्पोर्ट आणि युटिलिटी हे इस्रायलच्या जीडीपीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यातून इस्रायलला प्रचंड कमाई होते. तंत्रज्ञान आणि शस्त्रांच्या बाबतही इस्रायलची ओळख अधिक आहे. इस्रायलची टेक कंपनी जगभरात आपल्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्टससाठी ओळखली जाते. ऑटिक्स, मेडिसीन, बायोटेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रात इस्रायलचे अनेक अॅडव्हान्स प्रोडक्ट्स आहेत. या प्रोडक्ट्सची जगभरात मागणी आहे. या सेक्टर्समध्ये इस्रायल बक्कळ नफा कमवत आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.