इक्वेडोरच्या तुरुंगात रक्तरंजित खेळ; कैद्यांचा एकमेकांवर बंदुक आणि स्फोटकांनी हल्ला, 68 ठार

इक्वाडोरमधील सर्वात मोठे जेल म्हणून ओळख असलेल्या 'लिटोरल पेनिटेंशरी' तुरुंगात कैद्यांच्या दोन गटामध्ये शस्त्रांसह तुफान हाणामारी झाली.  ही घटना इतकी भीषण होती की, या हल्ल्यामध्ये तब्बल 68 कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

इक्वेडोरच्या तुरुंगात रक्तरंजित खेळ; कैद्यांचा एकमेकांवर बंदुक आणि स्फोटकांनी हल्ला, 68 ठार
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 9:15 AM

नवी दिल्ली – इक्वाडोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इक्वाडोरमधील सर्वात मोठे जेल म्हणून ओळख असलेल्या ‘लिटोरल पेनिटेंशरी’ तुरुंगात कैद्यांच्या दोन गटामध्ये शस्त्रांसह तुफान हाणामारी झाली.  ही घटना इतकी भीषण होती की, या हल्ल्यामध्ये तब्बल 68 कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 25 पेक्षा अधिक कैदी जखमी झाले आहेत. हा तुरुंगामध्ये झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. इक्वाडोरच्या गुआयाक्विल शहरात स्थित  ‘लिटोरल पेनिटेंशरी’ जेलमध्ये आंतरराष्ट्रीय  ड्रग्स रॅकेटशी संबंधित असलेले कैदी ठेवण्यात आले आहेत. याच कैद्यांच्या दोन गटामध्ये तुफान राडा झाला. या घटनेत 68 कैद्यांचा मृत्यू झाला आहे.

बॉम्बने भिंत उडवण्याचा प्रयत्न 

कैद्यांच्या दोन गटांमध्ये तब्बल आठ तास ही धुमसचक्री चालल्याची माहिती समोर येत आहे. गुआस प्रांताचे गव्हर्नर पाब्लो अरोसेमेना यांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला, या वादानंतर कैदी आपसात भिडले. आरडीएक्सचा वापर करून कैद्यांनी भिंत देखील उडवण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये 68 कैद्यांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत. जवळपास सातशे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा जेलमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. हे सर्व कैदी आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणाशी संबंधित होते.

तुरुंगात आठ हजारांपेक्षा अधिक कैदी

‘लिटोरल पेनिटेंशरी’ हे जगातील काही प्रमुख मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगामध्ये सध्या आठ हजारांपेक्षा अधिक कैदी हे कारावासाची शिक्षा भोगत आहेत. यातील बहुतांश कैदी हे ड्रग्स प्रकरणाशी संबंधित आहेत. यापूर्वी देखील अशीच एक घटना या तुरुंगामध्ये घडली होती. या घटनेत देखील अनेक कैदी मारले गेले होते. दरम्यान  या हल्ल्यानंतर कैद्यांजवळ शस्त्रे आली कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. याबाबत बोलताना तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, कैद्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तू  ज्या वाहनांमधून पुरवण्यात येतात त्यातून या शस्त्रांची तस्करी करण्यात आल्याची शक्यता आहे. घटनेबाबत चौकशी सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य, महिला कैद्याला नग्न नाचवले

बहरीनमध्ये कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता, आतापर्यंत 97 देशांनी दिली परवानगी

Afghanistan Bomb blast: मशिदीत स्फोट, मौलवीसह 12 लोक जखमी, 3 मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.