विकृतपणाचा कळस! केकवर गृप्तांगाची डिझाईन, महिलेला अटक

इजिप्तच्या एका महिलेने केकवर विकृत डिझाईन काढल्याने ती अडचणीत आली आहे (Egypt women arrest on making perverted design cake)

विकृतपणाचा कळस! केकवर गृप्तांगाची डिझाईन, महिलेला अटक
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 3:11 PM

कैरो (इजिप्त) : प्रत्येकाची वेगवेगळी आवडनिवड असते. कुणाला वाचणाची आवड असते, कुणाला फिरण्याची, कुणाला चित्रकलेची तर कुणाला स्वयंपाक करण्याची आवड असते. या आवडीचं रुपांतर पुढे कलेतही होतं. या कलेचा आयुष्यात सदुपयोग केला तर ती कला आपल्याला भरपूर यश देते. मात्र, या कलेचा वापर चुकीच्या मार्गासाठी केला तर त्याचा परिणाम वाईट होतो. त्या गोष्टीचा नंतर आपल्यालाच त्रास होतो. असाच काहीसा प्रकार इजिप्तच्या एका महिलेसोबत घडला आहे. तिने बनवलेल्या केकमुळे तिला जेलची वारी करावी लागली (Egypt women arrest on making perverted design cake).

इजिप्तच्या एका महिलेचा केकचा व्यवसाय आहे. ती वाढदिवसाच्या केकची ऑर्डर घेते. तिला एका स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी केकची ऑर्डर दिली. मात्र, त्या केकच्या डिझाईनसाठी त्यांनी तिला एक फोटो दाखवला. त्या फोटोनुसारच केकवर डिझाईन असावी, असं त्यांनी महिलेला सांगितलं. महिलेने पैशांच्या मोहापाई होकार कळवला. अखेर वाढदिवसाच्या दिवशी तो केक संबंधित ठिकाणी पाठवण्यात आला. त्या केकवर पुरुषाच्या गुप्तांगाची डिझाईन होती.

वाढदिवसाची जोमात पार्टी सुरु होती. जो केक बघायचा त्याला हसू आवरेनासं व्हायसं. याच थिल्लरपणात एकाने केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी केकच्या डिझाईनवर सडकून टीका केली (Egypt women arrest on making perverted design cake).

काही लोकांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या अशाप्रकारच्या डिझाईनमधून लहान मुलांवर काय संस्कार होतील, असा मुद्दा काही लोकांनी उचलून धरला. केकचा डिझाईनचा मुद्दा इतका तापला की त्यामुळे अखेर पोलिसांना यात मध्यस्ती करत संबंधित केक तयार करणाऱ्या महिलेला अटक करावी लागली.

पोलिसांनी सुरुवातीला ज्यांनी फोटो व्हायरल केला त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दोघं-तिघांना भेटत पोलीस महिलेपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीने महिलेला अटक केली. संबंधित केकविषयी महिलेची चौकशी करण्यात आली. या चौकशीत महिलेने एका स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांनी अशाप्रकारच्या डिझाईनच्या केकची ऑर्डर दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

संबंधित महिलेची जामिनावर सूटका झाली आहे. मात्र, पुन्हा चौकशी करण्यासाठी बोलावलं तर पोलीस ठाण्यात यावं लागेल अशी ताकीद देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केकची ऑर्डर देणाऱ्या दोघा-तिघांना शोधून काढलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. देशातील स्वातंत्र्य नष्ट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : आठवले म्हणाले ट्रम्प यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचं नाव बदनाम, ट्रम्प आता नवा पक्ष काढणार, नावही फायनल?

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.