Elon Musk Twitter : एलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत (Elon Musk Buys Twitter) घेतलं आहे. त्यासाठी त्यांनी कंपनीला 44 अब्ज डॉलरची ऑफर दिली होती, जी कंपनीने स्वीकारली. मस्क(Elon Musk Twitter Deal) यांनी दोन आठवड्यांपूर्वी असे म्हटले होते की, ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि तेच या क्षमतेला चालना देतील. अर्थात ट्विटर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ग्वाही असल्याचा दृढविश्वास असून त्यासाठी ते ट्विटरची अनेक समाज माध्यमांवर वकिली करत होते. हा करार मान्य झाला असला तरी 21 अब्ज डॉलरच्या या कराराबाबतचे गूढ आणखी गडद होत चालले आहे. या कराराची रक्कम रोखीने देण्याचा निश्चिय मस्क यांनी बोलून दाखवला होता. पण आता प्रश्न असा आहे की, एवढी रक्कम मस्क (Twitter Deal) कुठून उभे करणार. 21 अब्ज डॉलरची रोख रक्कम उभी करण्यासाठी त्यांना रणनीती आखावी लागणार आहे, ते इतर उद्योगातील त्यांचे शेअर्स विक्री करण्याची शक्यता आहे.
ट्विटरची इक्विटी खरेदी करण्यासाठी 21 अब्ज डॉलर रोख देणार असल्याचे मस्क यांनी सांगितले. पण आता उरलेले पैसे तो कुठे घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार (Bloomberg Billionaires Index ) त्यांची एकूण संपत्ती 257 अब्ज डॉलर इतकी आहे यात शंका नाही. पण ब्लूमबर्गचा अंदाज आहे की मस्ककडे केवळ 3 अब्ज डॉलर्सची रोकड आणि काही विक्री योग्य मालमत्ता (Liquid Assets)आहेत.
भागविक्री – एलन मस्क यांना अनेक गुंतवणूकदारांची मदत जरी मिळू शकली नाही तरी याचा अर्थ त्यांचे सर्व दरवाजे बंद होणार असे नाही. त्यांच्याकडे इतकी आर्थिक ताकद आहे, की त्यामुळे या समस्येवर ते एकटेच मार्ग काढू शकतील. कदाचित ते टेस्लामधील त्यांचा हिस्सा विकतील.
कंपनीचे शेअर्स 12.5 अब्ज डॉलरला देण्याचे वचन दिल्यानंतरही मस्क यांच्याकडे 21.6 अब्ज डॉलरचे शेअर्स शिल्लक आहेत. पण शेअर्सची किंमतही बऱ्यापैकी मार्केटवर अवलंबून असते. या महिन्याच्या सुरुवातीपासून शेअर्सच्या किंमती 8 टक्क्यांनी घसरल्या आहेत.. एलन मस्क आपल्या स्पेसएक्स आणि बोअरिंग कंपनीच्या खासगी कंपन्यांचे शेअर्स विकू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदृढ लोकशाहीसाठी व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य जगभारातील नागरिकांकडे असायला हवे. त्यांच्या विचारांना योग्य प्लॅटफॉर्म असायला हवा आणि ट्विटर हे चतुरस्त्र डिजिटल शहर असून मानवी मुल्यांसाठी भविष्यात हे मोठे आयुध असेल असे मत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटर विकत घेणारे एलॉन मस्क यांनी याविषयीचा करार पूर्ण झाल्यावर जाहीर केले.
इतर
Skin : मेकअप काढण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!
Royal Enfield Fire : तुमच्याकडे बुलेट असेल तर तुम्ही ही बातमी बघाच! आधी इंजिनमधून धूर आणि मग जाळ