Elom Musk : गांजा फुंकताना एलन मस्कने शेअर केला फोटो, नेटिझन्सही राहिले दंग, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

टेस्लाचे सीईओ एलन मस्क ट्विटरचा सर्वात मोठा भागधारक बनला आहेत. मात्र, ट्विटरच्या मिटिंगआधीच मस्क यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ते गांजा फुंकताना दिसतायेत. त्या फोटोखालील कॅप्शनमध्ये मस्क याने ट्विटरच्या पुढील मिटिंगसंदर्भात संकेत दिले आहेत. आता मस्क याने फोटो टाकला तर चर्चा होणारच ना.

Elom Musk : गांजा फुंकताना एलन मस्कने शेअर केला फोटो, नेटिझन्सही राहिले दंग, ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
Elon Musk Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 2:31 PM

मुंबई : टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elom Musk) ट्विटरचे सर्वात मोठा भागधारक बनला आहेत. मात्र, ट्विटरच्या (Twitter) मिटिंग (Meeting) आधीच मस्कने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो गांजा फुंकताना दिसतोय. त्या फोटोखालील कॅप्शनमध्ये मस्क याने ट्विटरच्या पुढील मिटिंगसंदर्भात संकेत दिले आहेत. आता मस्क याने फोटो टाकला तर चर्चा होणारच ना. यावर मस्क याचे स्वागत करताना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी लिहिले, ‘आम्ही @elonmusk यांना आमच्या मंडळावर नियुक्ती करत आहोत. हे सांगताना मला आनंद होत आहे! अलीकडच्या आठवड्यात इलॉन यांच्याशी झालेल्या संभाषणातून हे स्पष्ट झाले की ते आमच्या बोर्डाला खूप महत्त्व देईल.’ आता ही ट्विटरच्या बड्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आहे. मात्र, ट्विटरवर इतर अनेक रंजक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. याला एका दिवसापेक्षा कमी कालावधीत 50 हजारांपेक्षा अधिक रिट्विट्स आणि जवळपास पाच लाख लाईक्स आल्या आहेत. तसेच हे ट्विट व्हायरलंही झालंय.

टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचं ट्विट

नेटकऱ्यांच्या रंजक प्रतिक्रिया

एलन मस्कचं ट्विट आणि एडिट फिचर?

ट्विटरने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं होतं. आता एलन मस्क यानी याबाबत एक पोल ट्विट केला आहे. त्यांनी लोकांना विचारले आहे की, ‘तुम्हाला ट्विटरवर एडिट बटण हवं आहे का?’ यावर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ट्विटरने पोल आणि एडिट पर्यायाबाबत मिश्लिक ट्वीट केलंय. मस्क यांनी ट्विटरसंदर्भात त्यांचं मत व्यक्त केलं होतं. तेव्हा अनेकांनी म्हटले की, मस्कने नवीन सोशल प्लॅटफॉर्म विकसित करु नये. त्याऐवजी मस्क यांनी स्वतःच ट्विटर विकत घ्यायला हवं. एका युजरने म्हटले होते की, ‘काश एलॉन मस्क यांनी ट्विटर आधीच विकत घेतले असते….’

टेस्लाच्या उत्पादनांवर परिणाम

टेस्लाचे उत्पादन मागील तिमाहीच्या तुलनेत कमी राहिले आहे. पुरवठा साखळीतील (सप्लाय चेन) व्यत्यय आणि चिनी कारखान्यातील कामकाज ठप्प झाल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. सीईओ एलॉन मस्क म्हणाले, “चीनच्या झिरो-कोविड धोरणामुळे आणि पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे ही एक कठीण तिमाही होती.” टेस्लाने गेल्या तिमाहीत 3,10,048 वाहने वितरित केली. हे मागील तिमाहीपेक्षा किंचित जास्त आहे आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 68 टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, आता मस्क यांनी ट्विटरकडे मोर्चा वळवल्याने त्यांचे भविष्यातील निर्णय काय असतील, याकडे सध्या लक्ष लागून आहे.

इतर बातम्या

Mumbra मनसे कार्यालयाची तोडफोड, राष्ट्रवादीने तोडफोड केल्याचा मनसेचा आरोप

Nave Lakshya: ‘नवे लक्ष्य’ मालिकेत अदिती सारंगधर, श्वेता शिंदे पुन्हा साकरणार गाजलेली भूमिका

AC : एसी आहे की घरात बाँब ? बघता बघता स्फोट झाला अन् चौकोनी कुटुंबाचा अंत, दोन लहाग्यांचाही समावेश

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.