Jaishankar : भारताला धमकी देणाऱ्या युरोपियन युनियनला एस. जयशंकर यांचं ‘कडक’ उत्तर, काय आहे प्रकरण?
Jaishankar : भारताने आपला मैत्री धर्म निभावल्यामुळे युरोपियन देशांचा जळफळाट. थेट Action घेण्याची भाषा. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन देशांना सरळ सांगितलं, आधी वाचा, मग बोला.
नवी दिल्ली : युरोपियन युनियनने भारतावर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. रशियाकडून स्वस्त तेल खरेदीशी संबंधित हा विषय आहे. रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेऊन युरोपियन देशांना विक्री केली जाते. त्यावरुन युरोपियन युनियनचे अधिकारी जोसेप बोरेल यांनी भारतावर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. युरोपियन युनियनच्या धमकी नंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पलटवार केला आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इयूचे अधिकारी जोसेप बोरेल यांना, काऊन्सिल रेग्युलेशन पाहण्याचा सल्ला दिला आहे. रशियाने युक्रेन विरुद्ध मागच्यावर्षी युद्ध पुकारलं. त्यानंतर अमेरिकेसह अन्य युरोपियन देशांनी रशियावर निर्बंध घातले.
दोन्ही देशांसाठी फायद्याची स्थिती
रशियाने निर्बंधांमुळे होणारा आपला तोटा भरुन काढण्यासाठी स्वस्त दरात तेल विक्री सुरु केली. याचा भारत, चीनने फायदा उचलला. भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी केली. रशियाला त्याचे पैसे मिळाले. त्यामुळे भारत-रशिया दोन्ही देशांसाठी ही फायद्याची स्थिती होती.
जयशंकर यांनी काय सांगितलं?
आता या प्रकरणात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी, जोसेप बोरेल यांना, युरोपिनय युनियनचे रेग्युलेशन पाहण्याचा सल्ला दिला आहे. “रशियन तेल कुठल्या तिसऱ्या देशात रिफाइ केलं जातय. रिफाइन ऑइलला रशियन तेल मानलं जात नाही. मी तुम्हाला इयू 833/2014 रेगुलेशन पाहण्याची विनंती करेन” असं जयशंकर यांनी सांगितलं. ब्रुसेल्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयशंकर यांनी ही माहिती दिली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर सध्या बांग्लादेश, स्वीडन आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत. प्रतिबंधामागचा उद्देश काय?
“भारत रशियाकडून तेल विकत घेतोय. त्यानंतर याच तेलावर प्रक्रिया करुन ती तेल उत्पादन आम्हाला विकतोय. हे निर्बंधांच उल्लंघन आहे. रशियन महसूल कमी करणं हा प्रतिबंधामागचा उद्देश आहे. युरोपियन युनियला यावर मार्ग काढावा लागेल. आम्ही भारतावर कारवाई करु” अशी धमकी जोसेप बोरेल यांनी दिली. ते युरोपियन संघाच्या परराष्ट्र नितीचे उच्च प्रतिनिधी आहेत.