Explosion in Nigeria: नायजेरियात तेल कारखान्यात शक्तीशाली स्फोट, 80 जणांचा मृत्यू
Explosion in Nigeria : दक्षिण नायजेरियातील (Nigeria) एका बेकायद तेल कारखान्यात शक्तीशाली स्फोट (Explosion) झाला आहे.
नवी दिल्ली: दक्षिण नायजेरियातील (Nigeria) एका बेकायद तेल कारखान्यात शक्तीशाली स्फोट (Explosion) झाला आहे. या स्फोटात 80 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. “घटनास्थळावर आम्हाला 80 मृतदेह मिळाले आहेत. हे सर्व मृतदेह जळालेले असून अत्यंत वाईट स्थितीत आहेत” अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने (NEMA) दिली आहे. AFP ने हे वृत्त दिलं आहे. आपातकालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण नायजेरियातील रिव्हर्स आणि इमो या प्रांतातील बेकायद तेल कारखान्यात हा स्फोट झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने दिली आहे. “काही मृतदेह ओळखण्यापलीकडे जळालेल्या स्थितीमध्ये आहेत. हे सर्व मृतदेह जमिनीवर पडलेले आहेत. काही जण बचावासाठी पळाले. काहींनी झा़डांचा आसरा शोधला. त्यांचे मृतदेह झाडाजवळ आढळले आहेत” अशी माहिती नायजेरियन अधिकाऱ्यांनी दिली.
गाड्याही जळालेल्या स्थितीमध्ये
झाडाझुडूपांमध्ये सुद्धा काही मृतदेह आहेत. काहीजण छुप्या चोरीच्या मार्गाने तेल उत्खन्न करत होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली. काही गाड्याही जळालेल्या स्थितीमध्ये आहेत. अलीकडच्या काही वर्षातील नायजेरियामध्ये तेल कारखान्यात झालेला हा एक मोठा अपघात आहे. नायजेरिया हा तेलाने संपन्न असलेला देश आहे. तेलावर इथली अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
At least 80 killed in Nigerian oil blast, reports AFP News Agency citing emergency services
— ANI (@ANI) April 24, 2022
पाइपलाइन फोडून तेल चोरी
स्थानिक माध्यमांनुसार, 100 पेक्षा जास्त लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या दक्षिण भागात बेकायद तेल उत्खन्न सामान्य बाब आहे. चोर पाइपलाइन फोडून तेल चोरी करतात. काळ्या बाजारात तेलाची वक्री करणं, हा त्यांचा उद्देश असतो. नायजेरिया हा आफ्रिका खंडातील तेल उत्पादन करणारा मोठा देश आहे. खरंतर तेल निर्यातदार देश आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत. नायजेरियात मोठ्या प्रमाणात तेलाच्या विहिरी असूनही इथली जनता मात्र खस्ताहाल, गरिबीचे जीवन जगतेय.