वाशिग्टन : अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अवघ्या एक वर्षाच्या मुलाने केलेल्या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचे आणि मुलाचे नेमके काय नाते आहे? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र काही मिडीया रिपोर्टकडून मिळालेल्या माहितीनुसार हा व्यक्ती या मुलाचे वडील आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.
खेळता खेळता ट्रिगर दबले
घटनेबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, डस्टिन वाल्टर्स नावाचा एक 25 वर्षीय व्यक्ती हा आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात राहात होता. त्याच्या मुलाच्या हातात चुकून गोळ्यांनी भरलेली बंदुक लागली. त्याच्या हातून ट्रिगर दबले गेले. ही गोळी त्याच्या वडिलांना लागील. या घटनेमध्ये डस्टिन वाल्टर्स यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घरातील बंदुक ही इतक्या लहान मुलाच्या हाताला कशी लागली? इतका निष्काळजीपणा कसा असू शकतो? असे अनेक सवाल घटनेनंतर आता उपस्थित केले जात आहेत.
अमेरिकेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाकडून डस्टिन वाल्टर्स यांना गोळी लागली, तो मुलगा नेमका त्यांचा मुलगा आहे का? याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. मात्र तो त्यांचाच मुलगा असल्याचे बोलले जात आहे. या मुलाकडून बंदुकीशी खेळता -खेळता चुकून ट्रीगर दाबले गेले आणि ही गोळी वाल्टर्स यांना लागली. या घटनेमध्ये वाल्टर्स हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 5 डिसेंबरची आहे. मात्र ती 14 डिसेंबरला प्रथमच मिडीया समोर आली आहे.
Mumbai Crime: कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी, चौकीदारच निघाले चोरटे