पाकिस्तानी अणूबॉम्ब जनक अब्दुल खान यांची हत्या करण्याचा होता मोसादचा प्लॅन, इस्त्रायली पत्रकाराचा दावा

खान यांच्या हेतूंबाबत मोसाद या गुप्तचर संस्थेला माहिती मिळाली असती तर मोसादचे माजी प्रमूख शबतई शावित यांनी त्यांना ठार करण्यासाठी कधीच टीम पाठवली असती, असे या पत्रकाराने म्हटले आहे. तसेच ही माहिती खुद्द शावित यांनी काही वर्षांपूर्वी दिल्याचेही या पत्रकाराने सांगितलं आहे.

पाकिस्तानी अणूबॉम्ब जनक अब्दुल खान यांची हत्या करण्याचा होता मोसादचा प्लॅन, इस्त्रायली पत्रकाराचा दावा
Dr-Abdul-Qadeer-Khan
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 12:06 AM

येरुशलेम : पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादीर खान (Abdul Qadeer Khan) यांचे रविवारी वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. मात्र, सध्या इस्त्रायलच्या एका पत्रकाराने एक खळबळजनक दावा केला आहे. खान यांच्या हेतूंबाबत मोसाद या गुप्तचर संस्थेला माहिती मिळाली असती तर मोसादचे माजी प्रमूख शबतई शावित यांनी त्यांना ठार करण्यासाठी कधीच टीम पाठवली असती, असे या पत्रकाराने म्हटले आहे. तसेच ही माहिती खुद्द शावित यांनी काही वर्षांपूर्वी दिल्याचेही या पत्रकाराने सांगितलं आहे. अब्दुल खान यांनी पाकिस्तानला अणूबॉम्ब दिला. तसेच अणुशास्त्राची गोपनीय माहिती चोरली आणि विकली, असंसुद्धा या पत्रकाराने म्हटले आहे.

…तर खान यांना ठार करण्यासाठी टीम पाठवली असती

हा लेख हारेज या वर्तमानपत्रात छापून आला असून त्याला योस्सी मेलमॅन या पत्रकाराने लिहलं आहे. अब्दुल खान यांना पाकिस्तानमध्ये हिरो समजले जाते. साहजिकच त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण पाकिस्तान हळहळला. तर दुसरीकडे इस्त्रायलचे पत्रकार मेलमॅनने खान यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. इस्त्रायलची मोसाद ही गुप्तचर संस्था जगातील सर्वात शक्तीशाली आणि सक्रिय असलेली संस्था असल्याचे म्हटले जाते. या संस्थेला जर खान यांच्या हेतूंविषयी समजले असते तर त्यांनी खान यांना कधीच ठार केले असते, असे मोसादचे माजी प्रमुख शबतई शावित यांनीच सांगितले होते, असे मेलमॅनने म्हटले आहे.

खान यांची इराणला अणूउर्जेत संपन्न होण्यास मदत 

मेलमॅनने ‘हाऊ पाकिस्तान्स ए क्यू खान, फादर ऑफ द ‘मुस्लीम बम’, एस्केप्ड मोसाद अशॅसिनेशन’ या शीर्षकाखाली एक दीर्घ लेख लिहला आहे. यामध्ये त्यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. अब्दुल खान यांनी ग्लोबल न्यूक्लियर एक्स्टेंशन नेटवर्कचा फायदा घेतला. इराणला अणूउर्जेत संपन्न होण्यास मदत केली. लिबियाचा शासक मुहम्मद कज्जाफी याला अणूउर्जेसंबंधी मदत केली. एवढ्या साऱ्या गोष्टी करुनसुद्धा मोसादच्या ते लक्षात आलं नाही.

मोसादला खान यांचा हेतू समजू शकली नाही

खान यांनी पश्चिम आशियात अनेक देशात यात्रा केली, या सर्व यात्रांवर लक्ष ठेवण्याचे काम मोसादने केले होते. पण मोसादला खान यांचा हेतू समजू शकली नाही. हा हेतू मोसादला समजला असता तर मोसदाने त्यांना ठार करण्यासाठी माणसं पाठवले असते. मात्र ऐवढं सारं करुनही खान यांचा नैसर्गिक मृत्यू झाला, असं मेलमॅनने म्हटलं आहे.

इराणचा अणूउर्जा कार्यक्रम इस्त्रायलसाठी धोका

तसेच मेलमॅनने आपल्या लेखात इराणच्या अणूउर्जा कार्यक्रमाबाबत भाष्य केलं आहे. मुळात इराणच्या अणूउर्जा कार्यक्रमाला इस्त्रायल आपल्यासााठी धोका असल्याचे समजते. याच कारणामूळे इस्त्रायलने इराणच्या अणूउर्जेच्या महत्त्वाकांक्षेला नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधलेला आहे.

इतर बातम्या :

कॅलिफोर्नियात विमानाचा मोठा अपघात, मूळच्या पुण्यातील डॉक्टरसह आणखी एकाचा मृत्यू

ड्रोनने शहरात जेवण आणि आयस्क्रिमची डिलीव्हरी, इस्रायलमध्ये अद्यायावत ड्रोन कार्यक्रम सुरु, जगभरात लवकरच नवी सप्लाय चैन

पाकच्या अणवस्त्र कार्यक्रमाचे जनक अब्दुल कादीर खान यांचं निधन; एका रात्रीत ठरलेले हिरो

(father of pakistan nuclear program abdul qadeer khan would be kill by mossad if his intention were come to know)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.