तालिबान आणि NRF मध्ये लढाई तेज, अमरुल्ला सालेहचा भाऊ ठार, अहमद मसूदचे हत्यारही तालिबान्यांच्या हाती

तालिबाननं ज्या ज्या ठिकाणी कब्जा मिळवलाय तिथं मोठ्या प्रमाणात लोकांवर हल्ले, हिंसाचार केला जात असल्याचं इराणी मीडियानं रिपोर्ट केलंय. पंजशीरमधून पाकिस्ताननेही दूर राहावं अशी भूमिका इराणनं घेतलेली आहे. त्यामुळेच तालिबान, पाकिस्तान आणि इराण अशा तिघांमध्ये पंजशीरवर वाद होताना दिसतोय.

तालिबान आणि NRF मध्ये लढाई तेज, अमरुल्ला सालेहचा भाऊ ठार, अहमद मसूदचे हत्यारही तालिबान्यांच्या हाती
जिथं अमरुल्ला सालेह बसले तिथंच आता तालिबानी अतिरेकी
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 5:11 PM

अफगाणिस्तानमधून मोठी घडामोड समोर येतेय. पंजशीर व्हॅलीत (Panjshir valley)तालिबानी आणि एनआरएफ यांच्यातली लढाईनं वेग पकडलाय. विशेष म्हणजे ह्या लढाईत अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह(Rohullah Saleh)हा ठार झाल्याचं कळतंय. एवढच नाही तर पंजशीर व्हॅलीत जिथं जिथं तालिबाननं कब्जा केलाय तिथं तिथं मोठ्या प्रमाणात लोकांना अत्याचर केले जात असल्याचही रिपोर्ट समोर येताय. नेमके किती लोकांना मारलं गेलंय याचा निश्चित असा आकडा समोर आलेला नाही. पण पंजशीरमध्ये तुंबळ युद्ध सुरु असून दोन्ही बाजूचा मृत्यूचा आकडा मोठा असल्याचं इराणी मीडियानं म्हटलंय.

आणि अमरुल्लाह सालेहच्या लायब्ररीत दहशतवादी काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधल्या एका लायब्ररीत बसून एक व्हिडीओ जारी केला होता. आता तिच लायब्ररी पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण तालिबानचा एक दहशतवादी त्याच खुर्चीवर बसलेला एक फोटो तालिबानकडून जारी करण्यात आलाय. याचाच अर्थ असा की, ज्या ठिकाणी बसून अमरुल्ला सालेह तालिबानला ललकारत होते त्याच ठिकाणी आता तालिबान पोहोचल्याचा दाखवलं जातंय. दरम्यान अहमद मसूदचा समर्थन करणारे मार्श दोस्तम यांनी ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान तसच आंतरराष्ट्रीय समुदयाला आवाहन केलंय. एनआरएफ आणि तालिबानमध्ये पंजशीरला घनघोर युद्ध सुरु आहे. त्याचा निकाल काहीही लागू शकतो. त्यामुळे तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याची घाई करु नका असं मार्शल दोस्तम यांनी म्हटलंय.

अहमद मसूदचे गोदाम ताब्यात अहमद मसूदच्याच नेतृत्वात NRF लढत आहे. पंजशीरचे शेर म्हणून अहमद मसूदला ओळखलं जातं. 1996 ला ज्यावेळेस तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला त्यावेळेसही त्यांना पंजशीर जिंकता आलं नव्हतं. यावेळेस मात्र पंजशीरच्या अनेक भागात तालिबानी घुसल्याचं दिसतंय. अहमद मसूदचं हत्यारांचं जे गोदाम आहे तेच तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.(Taliban in Panjshir) तालिबाननं एक व्हिडीओ जारी केलाय त्यात कब्जा केल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ किती खरा, किती खोटा याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण अहमद मसूदनं काही दिवसांपूर्वीच तालिबानला चर्चेचं आवाहन केलंय. त्यावरुन पंजशीरमध्ये तालिबानची पकड मजबूत होताना दिसतेय. तसच तालिबाननं ज्या ज्या ठिकाणी कब्जा मिळवलाय तिथं मोठ्या प्रमाणात लोकांवर हल्ले, हिंसाचार केला जात असल्याचं इराणी मीडियानं रिपोर्ट केलंय. पंजशीरमधून पाकिस्ताननेही दूर राहावं अशी भूमिका इराणनं घेतलेली आहे. त्यामुळेच तालिबान, पाकिस्तान आणि इराण अशा तिघांमध्ये पंजशीरवर वाद होताना दिसतोय.

तालिबान्यांचे महिला आणि पत्रकारांवर हल्ले तालिबान्यांचं अतंरीम सरकार अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात आलंय. दरम्यान ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार केले जातायत त्यावरुन काबूलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर उतरतल्यात. त्या मोर्चावर तालिबान्यांच्या टोळक्यांनी हल्ले करुन चाबकाचे फटके महिलांना दिले. महिलांचं काम फक्त लेकरं जन्माला घालणं आहे, नोकरी पेशा करणं नसल्याचं तालिबाननं म्हटलंय. यावर अफगाणिस्तानमध्ये महिलांचे मोर्चे निघाले. ह्या मोर्चावर तालिबाननं गोळीबार केला. काही ठिकाणी त्यांनी महिलांना मारहाणही केली. महिलांचा हा असंतोष कव्हर करणाऱ्या पत्रकारांनाही तालिबान्यांनी सोडलं नाही. त्यांनाही रक्तबंबाळ होईपर्यंत फटके लगावले.

काबूलमधून 16000 हजार ब्रिटीश-भारतीय सैनिकांनी माघार घेतली, पण निर्धारीत ठिकाणी फक्त एकच जिवंत पोहोचला, इतरांचं काय झालं? वाचा सविस्तर

Ganesh Chaturthi 2021 : तैमूर अली खान ते अनन्या पांडेपर्यंत सेलेब्सनं जल्लोषात केलं बाप्पाचं स्वागत, पाहा खास फोटो

80 टक्के फुफ्फुसाला संसर्ग, वर्गणीच्या पैशातून उपचार, अकोल्याचा पठ्ठ्या कोरोनाला हरवून UPSC च्या मुलाखतीसाठी सज्ज

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.