Operation Ajay : ‘ऑपरेशन अजय’…. इस्रायलमध्ये अडकलेले 212 भारतीय परतले; अजून इतके भारतीय अडकले

इस्रायल आणि हमास दरम्यान गेल्या आठवड्यात सुरू झालेलं युद्ध अजूनही सुरूच आहे. या युद्धात अनेकजण होरपळून निघाले आहेत. इस्रायलचे शेकडो नागरिक युद्धात मारले गेले आहेत. अनेक देशाचे नागरिक इस्रायलमध्ये अडकून पडले आहेत.

Operation Ajay : 'ऑपरेशन अजय'.... इस्रायलमध्ये अडकलेले 212 भारतीय परतले; अजून इतके भारतीय अडकले
operation ajayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 8:40 AM

नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमासमध्ये ( Israel-Hamas ) जोरदार युद्ध सुरू आहे. हमासने पूर्वतयारीनिशी इस्रायलवर हल्ला चढवला आणि इस्रायलची वाताहत झाली. अचानक झालेल्या या महाभयंकर हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले आहेत. तसेच हजारो लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात परदेशी नागरिकही मारले गेले आहेत. इमारती, घरे आणि कार्यालये या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. किती दिवस हे युद्ध चालेल याचा काहीच थांगपत्ता नाहीये. अनेक देशांचे नागरिक इस्रायलमध्ये अडकले असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रत्येक देशाकडून प्रयत्न होत आहेत. भारतानेही आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) हाती घेतलं आहे. तसेच आज या ऑपरेशनचा पहिला टप्पा यशस्वी पूर्णही केला आहे.

ऑपरेशन अजय अंतर्गत 212 भारतीयांना इस्रायलमधून मायदेशी आणण्यात आलं आहे. आज सकाळी 212 भारतीय नागरिकांचा एक जत्था AI1140 या विमानाने दिल्ली विमानतळावर दाखल झाला. इस्रायलहून आलेल्या या भारतीयाचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर यांनी या भारतीयांचे हालहवाल विचारत त्यांच्याशी चर्चा केली. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गुरुवारी चार्टर विमान इस्रायलच्या गुरियन विमानतळावर गेलं होतं.

प्रत्येक भारतीयाला आणणार

एकाही भारतीय नागरिाकंना आम्ही इस्रायलमध्ये अडकून पडू देणार नाही. सर्वांना मायदेशी परत आणणार आहोत. आमचं सरकार, आपले पंतप्रधान आणि आम्ही सर्वजण इस्रायलमधील भारतीयांचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहोत. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इस्रायलमधून भारतीयांना आणण्यासाठी मोठं काम केलं आहे. आम्ही त्यांचेही आभारी आहोत, असं राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

18 हजार भारतीय अडकले

इस्रायलमध्ये अजूनही 18 हजार भारतीय अडकलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही भारतीयाला इस्रायलमध्ये काहीही झालेलं नाही. फक्त एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याच्या आम्ही संपर्कात आहोत. त्याला तिथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

वेस्ट बँक आणि गाजातही अडकले

वेस्ट बँकमध्ये एक डझन भारतीय अडकले आहेत. तर गाजामध्ये 3-4 भारतीय अडकले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना परत आणलं जाणार आहे. मानवी हक्काचं पालन करणं हे आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्व आहे. तसेच दहशतवादाशी लढणं ही वैश्विक जबाबदारी आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं.

ऑपरेशन अजय सुरू

इस्रायल आणि हमास दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. हे युद्ध किती दिवस चालेल याची शक्यता नाही. युद्धाची भीषणता आणि दाहकता मोठी आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक भारतीयाला या ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधून आणलं जाणार आहे. त्यांच्यासाठी स्पेशल विमान पाठवलं जात आहे. तसेच या लोकांना येण्याजाण्याचा कोणताही खर्च द्यावा लागणार नाही. संपूर्ण खर्च भारत सरकारच उचलणार आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.