भारताच्या अंतरिम सरकारचे अर्थमंत्री, पाकचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांचा इतिहास नेमका काय?
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा आज स्मृतिदिन आहे. लियाकत अली खान यांची पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांनी रावळपिंडीमध्ये हत्या करण्यात आली.
![भारताच्या अंतरिम सरकारचे अर्थमंत्री, पाकचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांचा इतिहास नेमका काय? भारताच्या अंतरिम सरकारचे अर्थमंत्री, पाकचे पहिले पंतप्रधान, लियाकत अली खान यांचा इतिहास नेमका काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/10/16222448/liyaquat.jpg?w=1280)
नवी दिल्ली: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा आज स्मृतिदिन आहे. लियाकत अली खान यांची पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांनी रावळपिंडीमध्ये हत्या करण्यात आली. लियाकत अली खान चार वर्षे, दोन महिने आणि दोन दिवस पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यानंतर ख्वाजा नजीमुद्दीन पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान झाले आणि त्यांनी 17 ऑक्टोबर 1951 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. लियाकत अली खान यांनी पाकिस्तानचं पतंप्रधानपध भूषवण्यापूर्वी भारताच्या अंतरिम सरकारमधील अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
लियाकत अली खान कोण होते?
लियाकत अली खान यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1895 रोजी कर्नाल पंजाब येथे झाला. त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठातूनही शिक्षण घेतले. मुस्लीम लीगचे आघाडीचे नेते लियाकत अली खान हे पाकिस्तान चळवळीदरम्यान मुहम्मद अली जिना यांच्यासोबत खूप सक्रिय होते. याचा लाभ त्यांना भारताच्या फाळणीच्या वेळी मिळाला आणि ते पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले. ते काही दिवस भारताचे अर्थमंत्री ही होते.
लियाकत अली खान भारताचे अर्थमंत्री कसे?
भारत-पाकिस्तानच्या पूर्ण स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांच्यानियंत्रणात अंतरिम सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्येही जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते, ते भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान बनले. लियाकत अली खान या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यावेळी भारताचा अर्थसंकल्पही सादर केला होता. त्यावेळी भारताची फाळणी झालेली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीगच्या लियाकत अली यांच्याकडं अर्थमंत्रिपद होते. 1947 मध्ये भारत-पाकिस्तानची फाळणी झाली आणि दोन्ही देश स्वतंत्र झाले. यानंतर, लियाकल अली यांना पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले.
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
लियाकत अली खान यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होतीय परंतु 16 ऑक्टोबर 1951 रोजी रावळपिंडी येथे त्यांची हत्या करण्यात आली. लियाकत अली खान चार वर्षे, दोन महिने आणि दोन दिवस पाकिस्तानचे पंतप्रधान होते. लियाकत अली खान यांनी 8 एप्रिल 1950 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक करार केला. दोन्ही देशांमध्ये अल्पसंख्यांकांचे अधिकार सुरक्षित करणे आणि भविष्यात युद्ध होण्याची शक्यता दूर करणे हा त्या कराराचा हेतू होता. मात्र, यामुळे अनेक नेते नाराज झाले होते.
काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी नेहरू आणि लियाकत अली यांच्यात झालेल्या करारामुळे 6 एप्रिल 1950 रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि जनसंघाची स्थापना केली. जनसंघानेच नंतरचे रुप म्हणजे भाजप होय.
भारतावर हल्ला
भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानने 1948 मध्ये भारतावर प्रथम हल्ला केला, त्यावेळी लियाकत अली खान पाकिस्तानचे पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या बाजूने केला गेला होता, तेव्हा ते हा हल्ला थांबवू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. लियाकतच्या मृत्यूनंतर 5-6 वर्षांच्या आत लष्करी जनरल अयुब खान यांनी सत्ता उलथवून टाकली. आणि पाकिस्तानात लष्करी राजवट सुरू झाली.
इतर बातम्या:
First Prime Minister of Pakistan liaquat ali khan he was finance minister of India before independence today his death anniversary