Israel-Hamas War | भयानक, पॅराशूट उघडलच नाही, मदत साहित्य अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू
Israel-Hamas War | मीडिया कार्यालयाने एअरड्रॉपचा काही फायदा नसल्याच म्हटलं आहे. मानवी सेवेऐवजी आकर्षक प्रचार म्हणून याचा वापर केला जातोय, असं गाजामधल्या सरकारच म्हणणं आहे. मदत साहित्य सीमा मार्गाने पोहोचवण्याची व्यवस्था करावी असं सुद्धा म्हटलय.
Israel-Hamas War | इस्रायल-हमास युद्धामध्ये अनेक निष्पाप, निरपराध नागरिक मारले जातायत. त्याचवेळी उपासमारीच संकटही खूप गंभीर आहे. दोनवेळच अन्न मिळवण्यासाठी पॅलिस्टिनी नागरिकांना वणवण करावी लागतेय. इस्रायलने अनेक प्रतिबंध घातले आहेत. त्यामुळे मानवी मदत पोहोचवण्याच्या मार्गात किती अडथळे आहेत, ते पुन्हा एकदा स्पष्ट झालय. काही देश हवाई मार्गाचा आधार घेऊन गरजूंपर्यंत मदत साहित्य पोहोचवतायत. शुक्रवारी विमानातून खाली फेकलेल पॅराशूट वेळेवर उघडलं नाही. परिणामी मदत साहित्य प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांच्या डोक्यावर कोसळलं. या दुर्घटनेत पाच नागरिकांचा मृत्यू झाला. काही जण जखमी झाले आहेत. गाजा शहरात शरणार्थी शिबिराच्या जवळ ही दुर्घटना घडली. लोक मदत सामन मिळेल म्हणून रांगेत उभे होते. गाजामध्ये असलेल्या सरकारच्या मीडिया कार्यालयाने ही माहिती दिलीय.
गाजा सरकारच्या मीडिया कार्यालयाने एअरड्रॉपचा काही फायदा नसल्याच म्हटलं आहे. मानवी सेवेऐवजी आकर्षक प्रचार म्हणून याचा वापर केला जातोय, असं गाजामधल्या सरकारच म्हणणं आहे. मदत साहित्य सीमा मार्गाने पोहोचवण्याची व्यवस्था करावी असं सुद्धा म्हटलय. मागच्या आठवड्यात गाजाच्या मदत केंद्राजवळ इस्रायली सैन्याच्या गोळीबारात 100 पेक्षा अधिक लोक मारले गेले होते. जास्त मृत्यू चेंगराचेंगरीमध्ये झाल्याच इस्रायली सैन्याने म्हटलं होतं.
मदत पोहोचवण्याची ही महागडी पद्धत
23 जानेवारीपासून इस्रायली अधिकाऱ्यांनी गाजा पट्टीच्या उत्तर भागात मदत साहित्याचा पुरवठा करण्यापासून रोखलं आहे, असं गाजातील संयुक्त राष्ट्राची मुख्य संघटना UNRWA ने दावा केला. त्यानंतर इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, संयुक्त अरब अमीरात सारख्या देशांनी एअरड्रॉपच्या मदतीने साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केलीय. मदत पोहोचवण्याची ही महागडी आणि निष्रभावी पद्धत असल्याच संघटनांच म्हणण आहे. वेळीच काही केलं नाही, तर गाजा पट्टीत अन्न-पाण्याची भीषण समस्या निर्माण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिलाय. गाजा पट्टीतील संघर्षात मागच्या पाच महिन्यात 30 हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.