नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू

नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टरला अपघात झाल्याने ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला जाणाऱ्या या हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते असे सांगण्यात येत आहे. यामध्ये चार चिनी नागरिक होते.

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 4:08 PM

नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला येथे जात असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये चार चिनी नागरिकांचाही सहभाग होता. अलीकडेच 24 जुलै रोजी नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता हेलिकॉप्टर कोसळल्याने पुन्हा अपघात झालाय. खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर होते. पण विमानातील सर्व ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते. पण रस्त्यातच ते क्रॅश झाले.

शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी दुपारी हे हेलिकॉप्टर कोसळलाची माहिती पुढे आली आहे. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्ते डीआयजी दान बहादूर कार्की यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.

हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याप्रुबेसीला जात होते.

त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीच्या 9N-AZD हेलिकॉप्टरने काठमांडू येथून दुपारी 1:54 वाजता स्याप्रुबेसी, रसुवा येथे उड्डाण केले. कॅप्टन अरुण मल्ला हे हेलिकॉप्टर उडवत होते.

विमान दुर्घटनेत १८ लोकांचा मृत्यू

नेपाळची राजधानी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही दिवसांपूर्वीच विमान धावपट्टीवरून घसरल्याने अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला होता. शौर्य एअरलाइन्सचे हे 9N-AME (CRJ 200) विमान काठमांडूहून पोखराला जात होते. त्यावेळी त्याला अपघात झाले. विमानात पायलटसह १९ जण होते. त्यापैकी बहुतांश विमान कंपनीचे तांत्रिक कर्मचारी होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान टेक-ऑफसाठी धावपट्टीवर आले, विमानाचा वेग वाढताच ते अचानक एका बाजूला झुकले आणि त्याचा पंख जमिनीवर आदळले, त्यामुळे विमानाला आग लागली.  हायस्पीड विमान आगीच्या ज्वाळांमध्ये अडकले आणि धावपट्टीवरून घसरले आणि उजव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले.

अपघातानंतर लगेचच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवली. विमानाचा कॅप्टन मनीष शाक्य याला जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. पण यामध्ये 18 जणांना प्राण गमवावे लागले होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.