आताची सर्वात मोठी बातमी, अमेरिकेची संपूर्ण विमानसेवा ठप्प

America flights grounded : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आलीय. अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवा ठप्प झालीय.

आताची सर्वात मोठी बातमी, अमेरिकेची संपूर्ण विमानसेवा ठप्प
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 6:03 PM

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आलीय. अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवा ठप्प (America flights grounded)  झालीय. विमानांना लँण्डिंगमध्ये प्रोब्लेम येत असल्याची माहिती समोर आलीय. काही तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या उद्भवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. पण यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. विमानसेवेवर याचा मोठा परिणाम पडलाय. विशेष म्हणजे अमेरिका (America) हा देश जगातील सर्वात समृद्ध देशांपैकी एक आहे. जगभरातून हजारो नागरिक नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत जातात. सर्वश्रेष्ठ गोष्टी अमेरिकेत आहेत. अमेरिकेला शेकडो भारतीय आहेत. हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी दरवर्षी अमेरिकेत जातात. त्यामुळे अमेरिकेत अचानक अशाप्रकारे विमानसेवा ठप्प झाल्याने शेकडो भारतीयांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल एव्हीएसन अॅडमिनिस्ट्रेशन ही विमानसेवेवर देखरेख ठेवणारी संस्था आहे. या संस्थेकडून या सर्व गोंधळावर स्टेटमेंट जारी करण्यात आलंय. काही तांत्रिक अडचणींमुळे विमानसेवेवर याचा प्रभाव पडल्याची माहिती समोर येतेय.

हे सुद्धा वाचा

सिस्टमचं सर्व्हर बिघडलं आहे. त्यामुळे विमानसेवेवर त्याचा फार मोठा परिणाम पडलाय. संपूर्ण देशात जवळपास 25 हजार विमानांमधून प्रवास करणारे लाखो प्रवाशी यामुळे बाधित झाले आहेत. शेकडो विमान सध्याच्या घडीला आकाशात घिरट्या घालत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

संबंधित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जातेय. सायबर हल्ल्यामुळे हा बिघाड झालाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अनेक विमानं आकाशात, विमानतळांवर गर्दी

अमेरिकेत उद्भवलेल्या या समस्येमुळे मोठा गोंधळ उडालाय. सर्व्हर डाऊन असल्याने लँण्डिंगला अडचणी येत आहेत. त्यामुळे शेकडो विमानं हे हवेतच घिरट्या मारत आहेत. दुसरीकडे विमानतळांवर प्रचंड गर्दी वाढली आहे. लाखो प्रवाशी विमानांची वाट पाहत आहेत. अनेकांना त्याचा फटका बसला आहे.

भारतीय विमानसेवेवर काही परिणाम होणार?

अमेरिकेत उडालेल्या या गोंधळाचा फटका भारतीय विमान सेवेवर देखील थोड्याफार प्रमाणात बसू शकतो. भारत-अमेरिका असा प्रवास शेकडो प्रवाशी दररोज करतात. त्यामुळे असा प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताला जितका फटका या गोंधळाचा बसणार आहे, तितकाच फटका संपूर्ण जगभरातील देशांनादेखील बसण्याची शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.