वॉशिंग्टन – कॅन्सर (Cancer)हा असा आजार आहे की ज्याचे औषध अजूनही विज्ञान शोधते आहे. मात्र रेक्टर कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका रुग्णांच्या टीमसोबत चमत्कार झाला आहे. प्रायोगिक पातळीवर या रुग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांदरम्यान या रुग्णांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आहे. या छोट्या क्लिनिकल ट्रायलमध्ये (clinical trial)१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या सगळ्यांना सहा महिन्यांसाठी डोस्टरलिमैब नावाचे औषध (medicine)देण्यात आले होते. सहा महिन्यानंतर या सगळ्या रुग्णांचा कॅन्सर बरा झाल्याचे समोर आले आहे.
“There were a lot of happy tears.”
हे सुद्धा वाचाIt was a small trial, just 18 rectal cancer patients, every one of whom took the same drug.
But the results were astonishing. The cancer vanished in every single patient. https://t.co/mYnlfUkKAs
— The New York Times (@nytimes) June 5, 2022
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीत ही माहिती देण्यात आली आहे. डोस्टरलिमैब हे असे औषध आहे जे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या अणूंपासून निर्माण केलेले आहे. हे औषध शरिरात एंटीबॉडिजला पर्याय म्हणून कार्य करते. रेक्टर कॅन्सरच्या या सगळ्या रुग्णांना हे एकच औषध देण्यात आले होते. सहा महिन्यानंतर या सगळ्यांचा कॅन्सर गायब झाल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यानंतर एंडोस्कोपी सारख्या शारिरिक चाचण्यातही कॅन्सर नसल्याचेच दिसून आले. हे कॅन्सरच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले अशी माहिती, न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या डॉ. लुईस यांनी दिली आहे.
क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी होण्यापूर्वी हे सर्व रुग्ण कॅन्सरपासून सुटका करुन घेण्यासाठी दीर्घ आणि त्रासदायक अशा उपचारांचा मुकाबला करत होते. केमोथेरपी, रेडिएशन आणि ऑपरेशनसारखे पर्याय करुन झाले होते. या ट्रायलमध्ये सहभागी होताना हा उपचाराचा पुढच भाग आहे, असे समजून हे १८ रुग्ण यात सहभागी झाले होते. मात्र सहा महिन्यांनतर त्यांना जेव्हा हे कळले की आता उपचारांची गरज नाही, त्यांचा कॅन्सर बरा झाला आहे, तेव्हा त्यांचा स्वतावरच विश्वास बसेना. या परिणामांमुळे वैद्यकीय जगतही आश्चर्यचकित झाले आहे.
हे सगळे रुग्ण पूर्णपणे बरे होणे, हे अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया कॅलिफोर्नियाचे कॅन्सर विशेषज्ञ डॉ. एलन यांनी दिली आहे. हे संशोधन जागतिक पातळीवरचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हे उपचार सुरु असताना कोणत्याही रुग्णावर त्याचे साईड इफेक्ट दिसले नाहीत, त्यामुळे हे अधिक प्रभावशाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या उपचारांच्या ट्रायलदरम्यान रुग्णांना सहा महिने प्रत्येक तिसऱ्या आठवड्यात हे औषध देण्यात आले होते. हे सर्व रुग्ण कॅन्सरच्या एकाच स्टेजवर होते. कॅन्सर त्यांच्या रेक्टममध्ये गेला होता, मात्र इतर अवयवांपर्यंत तो पोहचला नव्हता. या औषधाचा रिव्ह्यू करणाऱ्या संशोधकांनी सांगितले की, हा उपचार आशादायी वाटतो आहे. मात्र याच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.