परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पत्नी आहे जपानी, खूप कमी लोकांना माहितीये त्यांची प्रेमकहाणी
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची जेव्हा मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली तेव्हा खूप लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या पदासाठी ते नक्कीच चांगले उमेदवार होते. कारण त्यांना या क्षेत्रात काम करण्याचा दांडगा अनुभव होता. पण एस जयशंकर यांची लव्हस्टोरी खूप कमी लोकांना माहित आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याबाबत खूप कमी लोकांना माहित आहे. ते त्यांच्या कठोर विनोदी उत्तरांसाठी खूप लोकप्रिय आहेत. सुब्रह्मण्यम जयशंकर हे भारताचे तीसवे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत ज्यांचे नाव अनेकदा चर्चेत असते. पण तुम्हाला माहीत आहे का की एस. जयशंकर हे दुसरे असे मुत्सद्दी आहेत, ज्यांना नटवर सिंग यांच्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एस. जयशंकर यांनी 1977 मध्ये मुत्सद्दी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. ते भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मध्ये सामील झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सिंगापूरचे उच्चायुक्त आणि झेक प्रजासत्ताक, चीन आणि अमेरिकेतील राजदूत म्हणून काम केले आहे. भारतीय मुत्सद्दी म्हणून त्यांनी केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल त्यांना 2019 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एस जयशंकर म्हणाले होते की, “युरोपच्या समस्या या जगाच्या समस्या आहेत, परंतु जगाच्या समस्या या युरोपच्या समस्या नाहीत, या मानसिकतेतून युरोपला बाहेर पडावे लागेल.” हे त्यांचे विधान इतके प्रसिद्ध झाले आणि चर्चेत राहिले. एस. जयशंकर यांचा जन्म 9 जानेवारी 1955 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील कृष्णस्वामी सुब्रह्मण्यम हे देखील सरकारी कर्मचारी होते. त्यांनी दिल्लीच्या एअर फोर्स स्कूल आणि बंगळुरूच्या मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलय. दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून रसायनशास्त्रात पदवी घेतली. एस जयशंकर यांनी राज्यशास्त्रात एमबीए आणि एम.फिल तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पीएचडी केली आहे.
एस जयशंकर यांना रशियन, इंग्रजी, तमिळ, हिंदी, संभाषणात्मक जपानी, चीनी आणि थोडी हंगेरियन भाषा देखील येते. याशिवाय ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत. एस. जयशंकर यांनी त्यांची पहिली पत्नी शोभा हे जेएनयूमध्ये शिकत असताना पहिल्यांदा भेटले होते. पण दुर्दैवाने त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी जपानी स्त्री, क्योकोशी लग्न केले.
त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर काही वर्षांनी एस. जयशंकर यांना जपानच्या टोकियो येथे भारतीय दूतावासात नियुक्त करण्यात आले. येथेच त्याची क्योको सोमेकावाशी भेट झाली, जी त्याची दुसरी पत्नी बनली.
एस जयशंकर यांचा विवाह जपानी वंशाच्या क्योको सोमेकावा नावाच्या महिलेशी झाला आहे. पण त्यांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून दूर ठेवायला आवडते. क्योको अनेकदा तिचे पती एस. जयशंकर यांच्यासोबत राजकीय पक्ष आणि कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत असली तरी ते तिच्याबद्दल क्वचितच जाहीरपणे बोलतात.
एस. जयशंकर आणि क्योको सोमेकावा यांच्या प्रेमकथेत भारतीय दूतावासाचा मोठा वाटा आहे. 1996 ते 2000 या काळात एस. जयशंकर यांनी जपानची राजधानी टोकियो येथील भारतीय दूतावासात डेप्युटी चीफ ऑफ मिशन म्हणून काम केले. जपानमधील या चार वर्षांत एस. जयशंकर यांची क्योको सोमेकावा यांच्याशी भेट झाली.
या सुंदर जोडप्याला मेधा जयशंकर, ध्रुवा जयशंकर आणि अर्जुन जयशंकर ही तीन मुले आहेत. मुलगी मेधा अमेरिकेत आहे, पण ध्रुव आणि अर्जुनबद्दल फारशी माहिती नाही. मेधा फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेली आहे आणि तिने बीबीसी शो, टॉकिंग मुव्हीजसाठी रिपोर्टर आणि कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केले आहे.
View this post on Instagram
क्योको जयशंकर आणि एस जयशंकर 9 जानेवारीला एकच दिवशी वाढदिवस साजरा करतात. त्या अनेकदा पतीसह विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये साडीत दिसतात.
सप्टेंबरमध्ये, क्योको जयशंकर यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान G20 शिखर परिषदेच्या प्रतिनिधींच्या सर्व पहिल्या जोडीदारांना होस्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्नी या नात्याने, क्योको पाहुण्यांना देशातील अभ्यासपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी जबाबदार होत्या.
जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या मान्यवरांच्या पत्नी असूनही, क्योको जयशंकर मीडियापासून दूर राहणे पसंत करतात. एस जयशंकर वारंवार मुलाखतींमध्ये त्यांच्या पत्नीच्या जपानी प्रभावाबद्दल आणि त्यांच्या संस्कृतीबद्दलच्या प्रेमाबद्दल शेअर करतात.