4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, या कंपन्यांनी स्वीकारला नवा कन्सेप्ट
वर्क फ्रॉम होमनंतर आता ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी असं कल्चर लवकरच प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. काही कंपन्यांनी याची सुरुवात देखील केली आहे. याबाबत एक ट्रायल घेण्यात आला. याबाबतचा एक अहवाल पुढे आला आहे.
मुंबई : कोरोना काळात वर्फ फ्रॉम होम ( Work From Home ) हा कन्सेप्ट भारतासह जगभरातील कंपन्यांना स्वीकारावा लागला. वेळेनुसार काही बदल होत असतात. त्यानंतर आता आठवड्यात ४ दिवस काम आणि ३ दिवस आराम ( 4 Day Working Concept ) हा नवा कन्सेप्ट कंपन्या स्वीकारत आहेत. हा कन्सेप्ट अनेक कंपन्यांसाठी फायद्याचा देखील ठरत आहे. ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एका अहवालात असे म्हटले गेले की, हा कन्सेप्ट फारच यशस्वी ठरत आहे.
आठवड्यात फक्त चार दिवस काम ( Four-day week ) करायला तुम्हाला पण आवडेल ना. पण यामध्ये तुमची कंपनी आहे का हे आधी जाणून घेऊया. कारण बहुतेक कंपन्यांनी या कन्सेप्टमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे. हा एक ट्रायल असणार आहे.
ब्रिटनमध्ये याची ट्रायल म्हणून सुरुवात झाली आहे. ब्रिटेनमध्ये या पायलट प्रोजेक्टमध्ये 61 कंपन्यांनी भाग घेतला आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये कर्मचाऱ्यांना ५ दिवसाचे काम ४ दिवसात करण्याचे सांगण्यात आले. आता या पायलट प्रोजेक्टवर ऑक्सफोर्ड आणि कॅम्ब्रिज सारखे विद्यापीठातील शिक्षक आणि तज्ज्ञ देखील लक्ष ठेवून होते. ज्यामध्ये त्यांने चांगला आऊटकम मिळाला.
अहवालात असे म्हटले गेले की, अनेक कंपन्यांनी 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम म्हणजेच 4 डे वर्किंगचा नियम सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. 91 टक्के कंपन्यांनी हा नियम स्वीकारलाय. 4 टक्के कंपन्यांना हा नियम त्यांच्यासाठी यशस्वी नसल्याचं म्हटलं आहे.
कंपन्यांनी या प्रोजेक्टला 10 पैकी 8.5 गुण दिलेत. बिझनेस Productivity आणि बिझनेस परफॉरमन्सबाबत 10 पैकी 7.5 गुण दिले गेले. रेव्हेन्यूच्या बाबतीत ही कंपन्यांना फायदा झाला. या ट्रायल दरम्यान रेव्हेन्यू 35 टक्के अधिक असल्याचं कंपन्यांनी सांगितलं.
Four Day Work Week कॅम्पेनमध्ये बँकिंग, मार्केटिंग, रिटेल, फायनान्स यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्या सहभागी झाले होते. या दरम्यान कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या बाबतीत ही कमी प्रमाणात समस्या जाणवल्या. यामुळे कंपन्यांचा अधिक फायदा होईल असं काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.