सावधान! जर्मनीपाठोपाठ फ्रान्स, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, दिल्लीतही कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. France and Germany will implement lockdown due to increasing corona cases

सावधान! जर्मनीपाठोपाठ फ्रान्स, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाऊन, दिल्लीतही कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 4:42 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे युरोपातील देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 40 वाढ झाल्यामुळे 2 नोव्हेंबरपासून लाॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फ्रान्समध्येही शुक्रवारपासून लॉकडाऊन करण्यात येणार आहे. स्पेनमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं आहे.  ( France and Germany will implement lockdown due to increasing corona cases )

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सार्वजनिक ठिकाणी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे, असे सांगितले. मनोरंजन क्षेत्रासंबंधी सर्व कामकाज बंद करण्यात आले आहे. चित्रपटगृह, ओपेरा, संगीत कार्यक्रमाची ठिकाणे, बार, रेस्टॉरंट नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत बंद राहणार आहेत.

फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांनीही देशात 1 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शुक्रवार (30) ऑक्टोबरपासून लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. यादरम्यान फ्रान्समध्ये फक्त अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय अडचण असल्यास बाहेर पडता येणार आहे. दुसऱ्या लाटेमध्ये काळजी घेतली गेली नाहीतर कोरोनामुळे मृत्यूंची संख्या 4 लाखांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन हा एकच उपाय आहे, असं फ्रान्समधील एका नेत्याने सांगतिले. लॉकडाऊन दरम्यान विकासकामे फक्त सुरु राहतील.मात्र, विद्यापीठे, ग्रंथालय, बार, कॅफे, रेस्टॉरंट, जिम, सार्वजिनक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली येणार आहे. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात नर्सरी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु राहणार आहेत.

फ्रान्समध्ये बुधवारी 36437 कोरोना रुग्ण आढळले तर 523 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या 12 लाख 35 हजार 132 वर पोहोचलीय तर 35 हजार 785 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये फ्रान्स 5 व्या स्थानी आहे.

नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णात झपाट्याने वाढ

दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यापैकी 73 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहे. भारतामधील 1 लाख 50 हजार 456 जणांनी जीव गमावला आहे. सध्या देशात 6 लाख 10 हजार 803 अ‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नवी दिल्लीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढ आहे. दिल्लीत 5 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5673 कोरोना रुग्ण दिल्लीत वाढले आहेत. सध्या दिल्लीत 29 हजार 378 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 70 हजार 14 झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Vaccine | पहिल्या टप्प्यातील काही किंवा सर्वच लसी अपयशी ठरण्याची शक्यता, युके वॅक्सिन टास्क फोर्स अध्यक्षांचा दावा

CORONA VACCINE | ब्राझीलमध्ये लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू, चाचणी सुरुच राहणार

( France and Germany will implement lockdown due to increasing corona cases )

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.