फ्रान्सने कमेंट अजिबात सहन केली नाही, ‘या’ मुस्लिम धार्मिक नेत्याला थेट काढलं देशाबाहेर
इमाम महजूब महजूबी बॅग्नॉल्स सूर सेज येथील एटाउबाच्या मशिदीत काम करत होता. त्याने आपल्या पोस्टचा बचाव केला. माझ्या पोस्टचा विपर्यास करण्यात आला, असं इमाम महजूब महजूबीने म्हटलं. पण फ्रान्सने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.
पॅरिस : फ्रान्सने एका मुस्लिम धार्मिक नेत्याविरोधात कठोर भूमिका घेतली. फ्रान्सने फक्त भूमिकाच घेतली नाही, तर त्याला देशाबाहेर काढलं. इमाम महजूब महजूबी या ट्युनिशियन मुस्लिम धार्मिक नेत्याला फ्रान्सने देशाबाहेरचा रस्ता दाखवला. फ्रान्सने इमाम महजूब महजूबीची कमेंटच सहन केली नाही. इमाम महजूब महजूबीने फ्रेंच राष्ट्रध्वजावर कमेंट केली होती. फ्रान्सने अंतर्गत मंत्री गेराल्ड दारमानीन यांनी ही घोषणा केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अंतर्गत मंत्री दारमानीन यांनी स्टेटमेंट पोस्ट केलीय. “कट्टरपंथीय इमाम महजूब महजूबीला आम्ही राष्ट्रीय हद्दीतून बाहेर काढलय. अटक केल्यानंतर 12 तासांच्या आत आम्ही ही कारवाई केलीय. कोणी काहीही बेकायद बोललं, तर ते आम्ही सहन करणार नाही” असं अंतर्गत मंत्री गेराल्ड दारमानीन यांनी स्पष्ट केलं.
इमाम महजूब महजूबीने काय म्हटलं?
न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, इमाम महजूब महजूबीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये फ्रान्सचा राष्ट्रध्वज सैतानी असल्याचा उल्लेख केला होता. इमाम महजूब महजूबी बॅग्नॉल्स सूर सेज येथील एटाउबाच्या मशिदीत काम करत होता. त्याने आपल्या पोस्टचा बचाव केला. माझ्या पोस्टचा विपर्यास करण्यात आला, मला फ्रेंच राष्ट्रध्वजाचा अपमान करायचा नव्हता असं इमाम महजूब महजूबीने म्हटलय.
देशाबाहेर काढण्याच्या आदेशात काय म्हटलेलं?
इमाम महजूब महजूबीला देशाबाहेर काढण्याच्या निर्णयाला न्यायायलयात आव्हान देणार असल्याच त्याच्या वकिलाने म्हटलय. फ्रेंच मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महजूबीला देशाबाहेर काढण्याचा जो आदेश आहे, त्या मध्ये तो मागास, असहिष्णू आणि इस्लामबद्दलची हिंसक कल्पना मांडण्याचा त्याच्यावर आरोप आहे. या मुस्लिम नेत्याला ट्यूनिशियाला जाणाऱ्या विमानात बसवून त्याच्या देशात पाठवून देण्यात आलं.